महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

निराधार महिलांना मिळाला 'आधार'

जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या प्रयत्नांना यश
निराधार महिलांना मिळाला 'आधार'
February 28, 2021 08:24 PM ago Indapur, Maharashtra, India

शहाजीनगर (महेश तुपे) : पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने शारदा शेतकरी माता-भगिनी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील विधवा, शेतकरी महिला, घटस्फोटित, परितक्ता व निराधार महिलांना पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मंजुरीचे पत्र बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आले.

बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील लाभार्थी महिला रतन सातपुते, ज्योती भोरडे, लता निकम, विमल क्षिरसागर, बाई ढोले, अनुराधा तोंडे, अलका गाडे, सुनिता हावळे, दिलशाद पठाण व शशिकला शिंदे उपस्थित होत्या.

सध्या कोरोनाची परिस्थिती असून या कठीण काळात महिलांना अर्थसहाय्य मिळाल्याने लाभार्थ्यांनी सदस्या अंकिता पाटील यांचे आभार मानले. यावेळी बावडा गावचे सरपंच किरण पाटील व विकास पाटील उपस्थित होते.

संबधित बातम्या