महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कांदलगावात ‘साऊ-जिजाऊ’च्या लेकींनी झाडे घेतली दत्तक

कांदलगावात ‘साऊ-जिजाऊ’च्या लेकींनी झाडे घेतली दत्तक
June 13, 2021 06:11 PM ago Indapur, Maharashtra, India

कांदलगावात पर्यावरणदिनाचे औचित्य साधत 'जागर पर्यावरणाचा, तुमच्या माझ्या आरोग्याचा' या उपक्रमांतर्गत गावातील एकूण २३बचतगटांच्या 'साऊ-जिजाऊ' महिला ग्रामसंघाच्या महिला सदस्यांनी प्रत्येकी एक झाड दत्तक घेतले, तसेच ते झाड लावून जगवण्याचा निर्धार केला व त्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. सरपंच श्री. रविंद्र पाटील व ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी उपसरपंच तेजमाला बाबर, रेखा बाबर, कोंडाबाई जाधव, कमल राखुंडे, उल्हास पाटील, विजय सोनवणे, बाळू गिरी, किसन सरडे, दशरथ बाबर, गावसमन्वयक निलोफर पठाण तसेच सर्व बचतगटाच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.

यावेळी उन्नती , जागृती, येडेश्वरी, जोगेश्वरी, महालक्ष्मी, रमाई, पंचशील, क्रांती, रघुवीर समर्थ, जय माता, एकता, प्रेरणा, वैष्णवीदेवी, ऋणानुबंध, विघ्नहर्ता, प्रगती, लोकसेवा, आंदुबाई, जिजाऊ, सावित्रीबाई, माऊली, कुलस्वामिनी अशा एकूण २३ बचतगटाच्या २५० महिला सदस्यांनी प्रत्येकी एक झाड लावून ते जोपासण्यासाठी दत्तक घेतले.

यावेळी बोलताना सरपंच श्री.पाटील म्हणाले की, कांदलगाव ऑक्सिजन हब होण्याच्या दृष्टीने गावातील सर्व महिलांनी उचललेले हे पहिले पाऊल आहे.त्यामुळे मी सर्व महिलांचे मनापासून कौतुक करतो, व आभार मानतो.

इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.विजयकुमार परिट म्हणाले की, सध्या कोविड काळात ऑक्सिजन तुटवडा असताना नैसर्गिकरित्या ऑक्सिजन मिळावा, यासाठी कांदलगावात करण्यात आलेला हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे.तसेच या उपक्रमाबद्दल सरपंच रविंद्र पाटील, ग्रामसेविका स्वाती चव्हाण व गावसमन्वयक निलोफर पठाण यांचे कौतुक व अभिनंदन केले व झाडांचे संगोपन करण्याबाबत मार्गदर्शन केले. आभार पांडुरंग इंगळे यांनी मानले.

संबधित बातम्या