महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

पुजा साळुंखे-शितोळे यांची विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या बारामती युवती अध्यक्षपदी निवड.

पुजा साळुंखे-शितोळे यांची विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या बारामती युवती अध्यक्षपदी निवड.
July 03, 2021 01:47 PM ago Baramati, Maharashtra, India

यापुर्वी बारामतीच्या राष्ट्रवादी युवती कॅाग्रेस उपाध्यक्ष व दौंड राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष म्हणूनही कार्यरत राजकारण तसेच समाजकारण दोन्हीमध्ये उल्लेखनीय कामगिरी

बारामती. : आजकाल राजकारण आणि समाजकारणात तरूणपिढीचा सहभाग हा फक्त सोशलमिडिया पोस्ट टाकण्यापर्यंतच पर्यंतच दिसून येतो. तरूणींचा सहभाग तर फारच कमी पण अशा परिस्थितही पुजा साळुंखे-शितोळे यांनी सामाजिक व राजकिय क्षेत्रात आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गेली कित्येक वर्ष राष्ट्रवादी युवती कॅाग्रेसच्या व दौंड राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष माध्यमातून राजकिय क्षेत्रात काम करत आहेत. तसेच करोना महामारीच्या काळात त्यांनी विश्वजन आरोग्य समितीच्या माध्यमातून गरजूंना मोफत रक्तपुरवठा, बेड उपलब्ध करून देणे, आर्थिक सहाय्य मिळवून देणे अशी अनेक कामे केली त्यांची या कामाची दखल घेऊनच त्यांची विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या बारामती युवती अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

आज पुजाताईंनी कित्येक राजकिय व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणींसमोर एक चांगल उदाहरण ठेवल आहे.

संबधित बातम्या