महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

महसूल विभागाच्या भूमिकेस वैतागून काळ्या फिती बांधून शेतकऱ्यांच्या कुटुंबासह आत्मदहन करण्याचा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिला इशारा

महसूल विभागाच्या भूमिकेस वैतागून काळ्या फिती बांधून शेतकऱ्यांच्या कुटुंबासह आत्मदहन करण्याचा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिला इशारा
March 04, 2021 04:25 PM ago Daund, Maharashtra, India

जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कारवाई व्हावी, न झाल्यास बाधित शेतकरी कुटुंबासह आत्मदहन करण्यात येईल. - निलेश जांबले.

दौंड -

प्रतिनिधी : आलिम सय्यद

संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी पुणे जिल्हा व वासुंदे येथील शेतकरी यांनी तहसीलदार दौंड, गटविकास अधिकारी दौंड, पोलीस स्टेशन दौंड, खनिकर्म विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांना वारंवार निवेदन देऊन अद्यापही नियमबाह्य बेकायदेशीर खाण उद्योगांवर कोणतीही कारवाई झाली नाही. प्रशासनास वारंवार लेखी तक्रारी, निवेदने देऊन प्रशासन जाणून-बुजून कार्यवाहीस टाळाटाळ करत आहेत. तरी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कारवाई व्हावी कारवाई न झाल्यास बाधित शेतकरी कुटुंबासह आत्मदहन करण्यात येईल, व यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.

याबाबतचे लेखी निवेदन आज दिनांक ३ मार्च २०२१ रोजी शेतकऱ्यांनी काळ्या फिती बांधून जिल्हाधिकारी यांना संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीच्या वतीने देण्यात आले आहे.

गेंड्याची कातडी पांघरून सुस्त बघ्याची भूमिका घेत असलेल्या महसूल विभागाने त्वरित कारवाई करावी अन्यथा होणाऱ्या आंदोलनाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार रहावे असे संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश जांबले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

संबधित बातम्या