स्व.स्वप्नील लोणकर च्या कुटूंबियांना सर्वोतोपरी मदत करणार; राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या कडून कुटुंबियांना 1 लाख रुपयांची मदत.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. आज सामान्य प्रशासन राज्यमंत्री श्री. दत्तात्रय मामा भरणे यांनी त्याच्या गंगासागर, फुरसुंगी येथील घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळेस त्यांनी भरणे कुटुंबाच्या वतीने स्व.स्वप्निल यांच्या कुटुंबाला आधार म्हणून एक लाख रुपयांची रोख मदत करण्यात आली. तसेच सदर विषयात मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे ठोस आश्वासन दिले.
यावेळी त्यांनी स्वप्नील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत तरुणांनी स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या घरच्या व्यक्तींचा विचार करून वाटचाल करावी असेही ते म्हणाले.