महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

एल. जी. बनसुडे विद्यालयामध्ये भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची १३०वी जयंती साजरी

कोविड सारख्या महामारीतही महापुरुषांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवणारे विद्यालय.
एल. जी. बनसुडे विद्यालयामध्ये भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची १३०वी जयंती साजरी
April 14, 2021 12:32 PM ago Indapur, Maharashtra, India

पळसदेव, इंदापुर : येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल, सेमी इंग्लिश अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आज डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली.

एल.जी. बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल, सेमी इंग्लिश अँड ज्युनिअर कॉलेज नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असते गेल्या वर्षभरापासून कोविड सारख्या महामारीतही आरोग्य व समाजाचे भान राखुन सर्व महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी सारखे उपक्रम राबवून महापुरुषांचे जगावर किती उपकार आहेत याची जाणीव ठेवतात.

आज दि. 14 रोजी जगातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने कर्तृत्वाने, राज्य केले अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे जनक, बहुजन समाजाचे उध्दारक, या देशाचे सर्व बहुजनांना सन्मानाने जगन्याचा अधिकार देणारे, कामगारांना न्यायमिळवून देणारे, शिक्षणाचे महत्व सांगणारे, परमपूज्य, ज्ञानसूर्य, भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त त्याच्या पवित्र स्मृतीस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत लक्ष्मण बनसुडे (नाना) यांनी पुष्पहार घालुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी ग्रा.प.सदस्य विशाल बनसुडे, प्राचार्य सुरज बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, उपप्राचार्य दत्तात्रय शिंदे, प्रविण मदने, अमोल मिसाळ, भावेश फासे, विभाग प्रमुख तेजस्विनी तनपुरे, ललिता लवटे, वंदना कुंभार, सुजाता ढवळे, शितल कांबळे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.

संबधित बातम्या