महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

ज्यांच्या साठी प्रामाणिक काम केले त्यांनी आम्ही अडचणीत असताना आमच्या कड़े पाठ फिरवली. मुनिर अत्तार , ग्रा.सदस्य , बावडा

ज्यांच्या साठी प्रामाणिक काम केले त्यांनी आम्ही अडचणीत असताना आमच्या कड़े पाठ फिरवली. मुनिर अत्तार , ग्रा.सदस्य , बावडा
May 25, 2021 08:46 AM ago , Maharashtra, India

ज्यांच्या साठी प्रामाणिक काम केले त्यांनी आम्ही अडचणीत असताना आमच्या कड़े पाठ फिरवली आणि आम्ही सदैव ज्यांच्या विरोधात राहिलो त्यांनी आम्हाला आम्ही अडचणीत असताना खुप मदत केले

माझ्या आईला काही दिवसा पूर्वी कोविड (करोना) झाला होता आई चा स्कोर 22 होता खुप खराब परिस्थिती होती त्यातून आई बरी तर झाली पण नाशिबाने परत म्यूकरमायकोसिस सारखा आजार झाला अत्ता हे सर्व आमच्या साठी काही तरी वेगळे होऊन बसले होते. काय करावे हे सुचत नव्हते मग ज्यांच्या साठी राजकारणात जीवाचे राण करुण प्रामाणिक काम केले होते ते काही तरी मदत आणि मार्गदर्शन करतील असे वाटले होते. म्हणून त्यांना खुप फोन कॉल केले पण आपले नशीब त्यांनी कॉल ही रिसिव केले नाही. मंग स्वतः निर्णय घेऊन पुणे (हडपसर) येथील सह्याद्रि हॉस्पिटल ला गेलो कोठे ही बेड मिळत नाही हे लक्षात येताच हातबल झालो. ज्या आमदारा साठी आपण सर्व काही केले ते तर आपला कॉल ही घेत नव्हते तर बाकी कोणता ही पर्याय दिसतच नव्हता आईच्या जीवन मरना चा प्रश्न समोर उभा राहिला होता मी पण गुडघे टेकले होते हतबल झालो होतो परंतु नाशिबाने साथ दिली राज्याचे माजी सहकार मंत्री मा श्री हर्षवर्धन पाटील साहेब याना माझ्या बावडा गावातील कोणी तरी माझ्या आई बद्दल ची माहिती दिली. आणि त्यांनी त्याच क्षणाला माला कॉल केला सर्व माहिती घेतली मी कोणत्या हॉस्पिटल ला आहे हे विचारले आणि बोलले दहा मिनिट थांब मी काही तरी करतो. आणि अवघ्या पाच मिनिटात सह्याद्री हॉस्पिटल मधून मला कॉल आला की पेशंट आत मधे घेउन या.... माझ्यासाठी तो क्षण खूप महत्त्वाचा होता. मा श्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मुळे खऱ्या अर्थाने आम्हाला खुप मोठा धिर मिळाला एवढेच नाही तर जो पर्यंत माझी आई हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होती तो पर्यंत *पाटील साहेबांचा रोज मला फोन येत होता व ते रोजची माहिती घेत होते. विचारपूस करीत होते. डॉक्टर सांगायचे हर्षवर्धन पाटील साहेबांचा तुमच्या पेशन्ट साठी आम्हाला फोन आला होता त्यांनी चौकशी केली. माझ्या गावचं पेशन्ट आहे चांगले उपचार करा असे त्यांनी सांगितले आहे. खरच काही दिवसा पूर्वी आपल्या कडून खुप मोठी चूक झाली आणि आपण फक्त गोड बोलणाऱ्या व्यक्ति च्या नादात काम करणाऱ्या व्यक्ति ची साथ सोडून बसलो

मी कोणासाठी काय केले आहे हे सगळे जाणतात

संबधित बातम्या