महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

महाराष्ट्रातील कब्बडी क्षेत्र हळहळलं, कब्बडी संघाच्या गाडीला अपघात.

महाराणा कबड्डी संघ, कळंब (ता. इंदापूर, पुणे) यांच्या गाडीला अपघात; २ जणांचा मृत्यू, तर इतर गंभीर जखमी.
महाराष्ट्रातील कब्बडी क्षेत्र हळहळलं, कब्बडी संघाच्या गाडीला अपघात.
March 17, 2021 08:11 PM ago Indapur, Maharashtra, India

विजापुर: महाराणा कबड्डी संघाचे कबड्डीपट्टू मंगळवारी दि १६ मार्च रोजी रात्री एका स्पर्धेसाठी हुबळीच्या दिशेने १३ जण तवेरा गाडीने निघाले होते. यादरम्यान विजापूर पासून पुढे ५० कि.मी. अंतरावर बुधवारी पहाटे ५ च्या सुमारास त्यांच्या तवेरा गाडीला ट्रकने धडक दिली व अपघात झाला.

या अपघातामध्ये सोहेल सय्यद व महेश अवटे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी असल्याचे समजले आहे. तर इतरांविषयी अजून कोणतीही खात्रीशीर माहीती समजली नाही. सर्व जखमी खेळाडूंना विजापूर येथे उपचारासाठी तत्काळ हलवण्यात आल्याचे समजते.

या घटनेची माहिती मिळताच कोल्हारा पोलीसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच कळंबमधून ग्रामस्थ विजापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

महाराणा कबड्डी संघ, कळंब हा पुर्ण राज्यात आपल्या खेळासाठी प्रसिद्ध आहे. यासंघातील अनेक जण खेळाडू कोठ्यातून पोलिस भरतीही झाले आहेत. तसेच अनेक चक्षकही या संघाने जिंकली आहेत. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच सर्व कब्बड्डीप्रेमींमध्ये व्यक्त केली जात आहे.

संबधित बातम्या