महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती, इंदापूर समोर बेमुदत धरणे आंदोलन.

संबंधित दोषी, अधिकारी व कर्मचारी यांच्या वर दलित अत्याचार विरोधी कायदा (अॅ ट्रोसिटी ऍक्ट) नुसार कारवाईची मागणी.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती, इंदापूर समोर बेमुदत धरणे आंदोलन.
March 11, 2021 10:35 AM ago Indapur, Maharashtra, India

दलित समाजाला नेहमीच उपेक्षिताची वागणुक देण्यात आली आहे. पण आता हे सहन केले जाणार नाही. दलित समाज आता एकवटला असुन भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर या अन्यायाच्या विरोधात भव्य असा लढा उभारेल. - वंचित बहुजन आघाडी.

इंदापुर : आनंदनगर ता. इंदापूर येथील दलित समाजात ये जा करणारा रस्ता हा तेथील धनदांडग्या, राजकीय पुढाऱ्यांकडून जाणीव पूर्वक अतिक्रमण करून अडवला गेला आहे. यासंबंधी वेळोवेळी पत्र व्यवहार करून, कागदपत्रे सादर करून देखील व मा. उपविभागीय अधिकारी सो. बारामती, मा.तहसीलदार सो. इंदापूर यांचे कारवाईचे आदेश दिले असताना देखील मा. गटविकास अधिकारी इंदापूर व त्यांचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी हे या प्रकरणात जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत.

या प्रकरणी दोषीवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अधिकारी वर्गाकडून मदतच करीत आहेत असे दिसते आहे.त्यामुळे संबंधित दोषींवर व अधिकारी, कर्मचारी यांच्या वर दलित अत्याचार विरोधी कायदा (अॅट्रोसिटी ऍक्ट) नुसार कारवाई करण्याची मागणी (दि.10) वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी इंदापूर शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी बहुजन ब्रिगेड महासंघ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष संदीप मोहिते, भटक्या विमुक्त संघटना चे अध्यक्ष तानाजी धोत्रे, रिपब्लिकन क्रांती सेना चे अध्यक्ष बाळासाहेब लोखंडे, इंदापूर तालुका कांग्रेस कमिटी सचिव महादेव लोंढे यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

संबधित बातम्या