महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

बारामती नगरपरिषदेच्या 158व्या वर्धापनदिन समारंभास सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे : मुख्याधिकारी महेश रोकडे

वर्धापन दिनानिमित्त चहापान व विविध उपक्रमास उपस्थित राहण्याचे केले आवाहन
बारामती नगरपरिषदेच्या 158व्या वर्धापनदिन समारंभास सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे : मुख्याधिकारी महेश रोकडे
December 30, 2022 09:44 PM ago Baramati, Maharashtra, India

बारामती : बारामती नगरपरिषदेचा 158वा वर्धापन दिन 1 जानेवारी रोजी संपन्न होत आहे यानिमित्त बारामती नगरपरिषदेत विविध उपक्रम सायंकाळी 5.00-6.30 या वेळेत राबविण्यात येणार आहे.

यानिमित्त सामाजिक संदेश देणारी पथनाट्य, प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशवी वाटप, शहरातील ओल्या कचऱ्यापासून बनविलेल्या कंपोस्ट खताचे वाटप, स्थानिक वृक्षांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी तुळशी रोप वाटप इ. कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

तरी या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.

संबधित बातम्या