महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

लवकरच भरणेमामांचा जाहीर नागरी सत्कार- सागर मिसाळ.

हर घर जल योजने अंतर्गत इंदापुर तालुक्यासाठी 249 कोटी मंजुर.
लवकरच भरणेमामांचा जाहीर नागरी सत्कार- सागर मिसाळ.
March 13, 2021 02:32 PM ago Indapur, Maharashtra, India

जंक्शन: हर घर जल योजने अंतर्गत जंक्शन ला 117 लाख रुपये तर आनंदनगर साठी 67 लाख रुपये पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली अशी महिती जंक्शन चे युवा नेते सागरबाबा मिसाळ यांनी दिली.

खुप दिवसापासून मा. राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा चे पालकमंत्री मा.श्री. दतामामा भरणे सो याचे कडे निवेदन मागणी केली होते. भरणेमाममांनी लोकांच्या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करून जंक्शन व आनंद नगर हर घर जल योजनेतून भरघोस निधी उपलब्ध करून दिला त्या बद्दल जंक्शन व आनंदनगर ग्रामस्थ यांच्या वतीने पुणे जिल्हा चे पालकमंत्री मा. अजितदादा पवारसो व बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार मा. सौ.सुप्रीयाताई सुळे सो व राज्यमंत्री दतामामा भरणे सो यांचे जाहीर मनःपूर्वक आभार व अभिनंदन केले.

या निधी मुळे जंक्शन व आनंदनगर मधील पाण्यासाठीची भंटकंती थांबणार आहे. प्रत्येक घराघरात पाणी नळ जोड कनेक्शन सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे जंक्शन व आनंदनगर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जंक्शन व आनंदनगर ग्रामस्थ यांच्या वतीने लवकरच भरणे मामांचा जाहीर नागरी सत्कार करणार आहे अशी माहीती युवा नेते सागर मिसाळ यांनी दिली.

संबधित बातम्या