महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कांदलगाव ग्रामपंचायतीचा उपक्रम महात्मा फुले व डॅा.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त ऑनलाइन व्याख्यानमाला

कोरोना काळातील प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाचे महत्व तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करावी? व कोरोना काळातील स्पर्धा परिक्षा व्यवस्थापन या विषयांवर ही व्याख्यामाला आयोजित करण्यात आली आहे
कांदलगाव ग्रामपंचायतीचा उपक्रम महात्मा फुले व डॅा.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त ऑनलाइन व्याख्यानमाला
April 12, 2021 10:45 PM ago Indapur, Maharashtra, India

कांदलगाव, इंदापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कांदलगावच्या वतीने ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेस त्या त्या विषयातील तज्ञ व्याख्याते लाभले असून 'लसीकरणाचे महत्व' या विषयावर डाॅ. सुवर्णा शिंदे यांचे व्याख्यान दु.२ वा. होणार आहे. तर स्पर्धा परिक्षांची तयारी या विषयावर केंद्रिय लोकसेवा आयोग परिक्षा विभाग बार्टी पुणेचे माजी संचालक डाॅ.सतीश पाटील यांचे व्याख्यान दु.३ वा.होणार आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणारी ही व्याख्यानमाला असल्याने कांदलगाव व इंदापूर परिसरातील तरूण वर्गाने या व्याख्यानाचा लाभ घ्यावा,असे आवाहन सरपंच श्री.रविंद्र पाटील यांनी केले आहे.

याबाबात अधिक माहिती देताना ग्रामसेविका स्वाती चव्हाण म्हणाल्या की, कोरोना प्रार्दुभाव सध्या सगळीकडे वाढत असल्याने ऑनलाइन उपक्रम घेण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे. ग्रामपंचायत कांदलगाव ही डिजीटल ग्रामपंचायत असल्याने सदर कार्यक्रमाची लिंक ही एक तास आधी ग्रामपंचायतीच्या www.grampanchayatkandalgaon.com या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच महामानवांच्या जीवनावर आधारित व चालू घडामोडींवर आधारित ज्ञानमंजुषा स्पर्धा सायं.५ वा.सुरु होईल. संध्याकाळी सात वाजेपर्यंत ग्रामपंचायतीच्या वेबसाइटवर ज्ञानमंजुषेचा निकाल जाहिर करण्यात येईल.

संबधित बातम्या