महाराष्ट्र सोशल मिडीयाची मोलाची कामगिरी; पंढरपूर विधानसभा पोट निवडणुक विजयात महत्त्वपूर्ण भूमिका.
महाराष्ट्र सोशल मिडीयाचे अध्यक्ष सतीश भाऊ साबळे यांचे मानले मनापासून आभार.

भाजपच्या समाधान आवताडेंच्या विजयात महाराष्ट्र सोशल मिडीयाने बजावली महत्वाची भूमिका.
पंढरपुर, सोलापूर : पंढरपुर विधानसभा पोट निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार करीत आपआपल्या पक्षाची व उमेदवाराची भूमिका जनतेसमोर मांडली. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग तसेच वाढता उन्हाळा यामुळे प्रचारसभा घेण्यास व जनतेसमोर जाण्यास सर्वच पक्षांना अडचणी येत होत्या. पण भाजपचा तंत्रशुद्ध प्रचार व महाराष्ट्र सोशल मिडीयाने केलेली सोशल मिडीयावरची जादु यामुळे भाजपच्या समाधान आवताडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगिरथ भालके यांचा पराभव केला.
ज्या ज्या वेळेस महाराष्ट्र सोशल मिडीयाने एखाद्या उमेदवाराची भूमिका जनतेसमोर मांडली आहे त्या त्या वेळेस तो उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असो विजयी झालेला आहे. महाराष्ट्र सोशल मिडीया 2007 सालापासून डिजिटल प्रचार व नंतर सोशल मिडीयावर कार्यरत असून महाराष्ट्र सोशल मिडीयाचे अध्यक्ष सतीश भाऊ साबळे, कार्याध्यक्ष रमेश तात्या पाटील, प्रभारी अध्यक्ष शिरीष कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात टीम कार्य करते.
महाराष्ट्र सोशल मिडीयाने नेहमीच सत्याची कास धरत प्रामाणिक उमेदवारास आपला पाठिंबा दिला आहे व त्या त्या उमेदवारानेही विश्वासाने महाराष्ट्र सोशल मिडीयास आपल्या राजकीय प्रचाराची धुरा सोपवली आहे. व त्याच विश्वासाने तो तो उमेदवार विजयी करण्यात महाराष्ट्र सोशल मिडीया पूर्णपणे यशस्वी झालेली आहे.
या विजयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असून त्यांनी महाराष्ट्र सोशल मिडीयाचे अध्यक्ष सतीश भाऊ साबळे यांचे मनापासून आभार मानले आहे.