महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी इंदापूर पंचायत समितीचा आरोग्य विभाग सज्ज; 'सेव्ह दि चिल्ड्रन' संस्थेचा पुढाकार

गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी मानले आभार.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी इंदापूर पंचायत समितीचा आरोग्य विभाग सज्ज; 'सेव्ह दि चिल्ड्रन'  संस्थेचा पुढाकार
June 25, 2021 06:12 PM ago Indapur, Maharashtra, India

'सेव्ह द चिल्ड्रन' संस्थेमार्फत ऑस्ट्रेलिया मधुन ५०० ऑक्सिजन काँसिंट्रेटर मागविण्यात आले होते व ते सर्व ५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मुंबई विमानतळावरून देशातील विविध राज्यात एकूण ३९ शहरात पोहविण्यासाठी संस्थेचे काम चालु आहे. यातील इंदापूर तालुक्यासाठी 2 व्हेंटिलेटर आणि 5 ऑक्सिजन काँसिंट्रेटर असे एकुण 7 लाख किंमती चे साहित्य भेट देण्यात आले.

इंदापुर : कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन व व्हेंटिलेटर अभावी भरपूर समस्यांचा सामना करावा लागला. राज्यातील खूप ठिकाणी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन काँसिंट्रेटर ची कमतरता भासत असताना राज्यातील विविध सेवाभावी संस्थांनी आपापल्या परीने मदत केली. सध्या कोरोणा रुग्णांची संख्या कमी असली व व्हेंटिलेटर व ऑक्सिजन काँसिंट्रेटर भरपूर प्रमाणात उपलब्ध असले तरी सुद्धा येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी मागील चुका सुधारून सुसज्ज राहणे काळाची गरज बनली आहे.

इंदापूर तालुक्यातील निरवांगी गावचे रहिवाशी असलेले हनुमंत पवार यांनी 'सेव्ह दि चिल्ड्रन' या संस्थेमार्फत इंदापूर पंचायत समितीला गटविकास अधिकारी माननीय विजयकुमार परीट साहेब यांच्याकडे 2 व्हेंटिलेटर व 5 ऑक्सिजन काँसिंट्रेटर सुपूर्द केले याबद्दल माननीय गटविकास अधिकाऱ्यांनी 'सेव्ह दि चिल्ड्रन' संस्थेचे हनुमंत पवार यांचे आभार व्यक्त करत शहरातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन प्रशासनास कोरोना विरुद्धच्या लढाईत मदत करत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरुद्ध ती येण्या अगोदरच तिला नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

यावेळी इंदापूर पंचायत समितीचा आरोग्य विभाग तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी हनुमंत पवार यांचे आभार मानत त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

'सेव्ह दि चिल्ड्रन' - बाल रक्षा भारत या संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ व्यवस्थापिका श्रीमती. इप्सिता दास मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे. त्यामध्ये आरोग्य विभागाला लागणारे यांत्रिक उपकरणे, औषधे, सर्जिकल सामान तसेच कोरोना महामारीमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील, झोपडपट्टीतील व ग्रामीण भागात आर्थिक अडचणीत सापडलेल्या जनतेला अन्न धान्य वाटप, वैयक्तिक कौटुंबिक स्वच्छतेसाठी किशोरवयीन मुली, गर्भवती माता, स्तनदा माता यांना स्वच्छता किट (हायजिन किट) वाटपाचे काम संस्थेचे मार्फत मागील वर्षी कोवीड महामारीमध्ये केले होते व ते या ही वर्षी वाटपाचे कार्य संस्थेमार्फत केले जात आहे.

संबधित बातम्या