महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

स्वयंघोषित पत्रकारांनो आपल्या पाकिटाकडे लक्ष देण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या : सतीश (भाऊ) साबळे, अध्यक्ष महाराष्ट्र सोशल मिडीया, महाराष्ट्र राज्य

स्वयंघोषित पत्रकारांनो आपल्या पाकिटाकडे लक्ष देण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या : सतीश (भाऊ) साबळे, अध्यक्ष महाराष्ट्र सोशल मिडीया, महाराष्ट्र राज्य
June 14, 2023 10:42 AM ago Maharashtra, India

माहिती तंत्रज्ञान व सोशल मिडीयाच्या युगात आता जगभरातल्या बातम्या एका क्लिक वरती मिळू लागल्या अन रोज नव नवीन स्वयंममघोषित न्यूज पोर्टल व पत्रकार तयार होऊ लागले पण या गर्दीत दर्दी पत्रकार व न्यूज चॅनल हरवले याचीच परिणीती म्हणुन पत्रकारिता फक्त पुढाऱ्यांच्या पुढे पुढे करीत व्यक्ती सापेक्ष बातम्या करू लागले व सर्व सामान्य लोकांच्या प्रश्नांना बगल देऊ लागले आणि म्हणूनच काही न्यूज पोर्टल फक्त एक म्हणजे एकाचीच (पक्षाची किंवा नेत्याची) बातमी करत आहेत एकंदरीत असं वाटत आहे ते न्यूज पोर्टल खरेदी केलेत किंवा पॅकेज घेत आहेत. एकाचीच बातमी किंवा उदो-उदो वारंवार करत आहेत.
उदा:-
१) सन्माननीय नेत्याचा आज शेतकऱ्याच्या बांधावरून प्रवास.
२) चक्क बांधावरून जाऊन शेतकऱ्याची भेट.
3) चक्क नेत्याने शेतकऱ्याच्या घरी जाऊन चटणी भाकर खाल्ली.

वरील उदाहरणे फक्त प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत थोडक्यात म्हणजे नेत्याने बांधावरून नाहीतर स्वतः रस्ता करून जायचे का तिथे. आणि काय फरक पडतो तो नेता बांधावरून गेला म्हणून. हे सामान्यतील सामान्य माणसाला समजत आहे. त्यामुळे चांगल्या माणसाची वाईट प्रतिमा आणि वाईट माणसाची चांगली प्रतिमा सोशल मिडियातून होत आहे. ठीक आहे उदो उदो करा पण इतकं बी आंबट करू नका, लोक त्या चांगल्या माणसाचा तिरस्कार करू लागतील.
मागे अशीच एक सोशल मिडियात डॉक्टरांच्या खुर्चीवर बसण्या वरून तालुक्यातील एका सन्माननीय व लोकप्रिय प्रतिनिधीवर टीकांची झोड उठवण्यात आली होती.
चवली-पावली वर खेळणारे काही सोशल मिडिया चालवणारे आणि त्यांना चवली पावली पुरवणारे पुढारी व काही स्विय सहाय्यक यांना याची अजिबात जान नाही असो सांगण्याचे तात्पर्य एवढेच की जास्त आंबट करणे बंद करा.
तालुक्यात हजारो मुले बेरोजगार आहेत त्यांची कधीही बातमी लागत नाही, हजारो माणसांना कामाची गरज आहे हजारो माणसांना अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज आहे हजारो माणसांना सहानुभूतीची गरज आहे, काही गरजा (रस्ते पाणी) भागवल्या म्हणजे त्या माणसांच्या अन्न, वस्त्र, निवारा. या मूलभूत गरजा त्यांना मिळू शकत नाहीत, चांगल्या माणसाचे चांगुलपण सांगण्याऐवजी वाईट गोष्टी नेत्यापर्यंत पोहोचवणारे लांडगे (चमचे) मात्र गाडी बंगले घेऊन, शुभ्र कपडे घालून आलिशांमध्ये फिरत आहेत आणि आमचे बांधव मात्र आपले चांगुलपण कसे नेत्यापर्यंत जाईल याची वाट पाहत आहेत.

सतीश (भाऊ) साबळे अध्यक्ष, महाराष्ट्र सोशल मिडीया, महाराष्ट्र राज्य

संबधित बातम्या