महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

शहाजीनगरात कोरोना लसीकरणास उस्फूर्त प्रतिसाद

शहाजीनगरात कोरोना लसीकरणास उस्फूर्त प्रतिसाद
July 02, 2021 10:50 AM ago Indapur, Maharashtra, India

शहाजीनगर : महेश तुपे

कोरोना लसीकरणासाठी आरोग्य विभागाने चांगलीच कंबर कसली आहे. भोडणीतील १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याकरिता बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शहाजीनगर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मंगळवारी (दि.२९) लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी १७० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यावेळी शासनाच्या नियमांचे पालन करून लसीकरण करण्यात आले. कोरोना लसीकरणास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बावडा आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिलकुमार वाघमारे व शहाजीनगर आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य सहाय्यिका मोनाली घोळवे, आरोग्य सेवक दत्तात्रय झगडे, पवार, डाटा ऑपरेटर वृषाली गुरव, आशा स्वयंसेविका लता नवले यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी संतोष जगताप, भोडणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मल्हारी लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी हांगे, सुनिल पवळ, पोलीस पाटील बापू खटके, अनिल शिंदे, माणिकराव खाडे यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

संबधित बातम्या