राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव आणि ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयीका रिताताई भुपेंद्र बाविस्कर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुलढाणा निरीक्षक पदी नियुक्ती.
महाराष्ट्र सोशल मिडीयाचे अध्यक्ष मा. सतीश भाऊ साबळे यांनी दिल्या शुभेच्छा.

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव आणि ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयीका रिताताई भुपेंद्र बाविस्कर यांची पक्ष बळकठीसाठी, संघटनेसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुलढाणा निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा माननीय सौ.रुपालीताई चाकणकर यांनी मा. रिताताई बाविस्कर यांना निवडीचे पत्र देऊन पुढील काळात आपल्या हातून पक्षाचे काम चांगल्या प्रकारे होईल अश्या शुभेच्छा दिल्या.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार, खासदार फौजिया खान, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने ही नियुक्ती करण्यात आलेली आहे.
रिता बाविस्कर या राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयीका असून त्यांनी ग्रंथालयाची चळवळ राज्याच्या ग्रामीण भागात पोहचवण्याच काम केलं आहे. तसेच त्या महाराष्ट्र सोशल मिडीयाच्या पदाधिकारीही राहिल्या होत्या. रिताताईंच्या या निवडीबद्दल अनेक स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या निवडीबद्दल ग्रंथालय विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. उमेशजी पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच या वाटचालीस महाराष्ट्र सोशल मिडीयाचे अध्यक्ष मा. सतीश भाऊ साबळे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
देशाचे आदरणीय नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब तसेच खासदार सौ. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष मा. जयंतरावजी पाटील साहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब व महिला प्रदेशाध्यक्षा माननीय सौ. रूपालीताई चाकणकर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभारी आहे,
तसेच मला दिलेली जबाबदारी मी मनापासून पार पाडेल व पक्षाचे काम तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.
रीताताई बाविस्कर