महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

इंदापुरात कोटींचा निधी रस्त्यांवर; लाडक्या लोकप्रतिनिधींना तरुणांच्या आर्थिक, शैक्षणीक, व्यावसायिक प्रगतीचे वावडे.

बारामतीच्या धर्तीवर एकही प्रकल्प नाही; इंदापूरकरांच्या भविष्यासाठी कोणतीच धेय्य धोरणे नाहीत.
इंदापुरात कोटींचा निधी रस्त्यांवर;  लाडक्या लोकप्रतिनिधींना तरुणांच्या आर्थिक, शैक्षणीक, व्यावसायिक प्रगतीचे वावडे.
August 23, 2021 01:56 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापुरच्या लोकप्रतिनिधींनी सध्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, फक्त काही मोजक्याच लोकांच्या व गावांकरीता कामे न करता जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी योजना व प्रकल्प राबविणे गरजेचे आहे नाहीतर जनता तुम्हालाही घरी बसल्याशिवाय राहणार नाही. मागच्या लोकप्रतिनिधींच्या चुकातून सध्याच्या लोकप्रतिनिधींनी शिकणे गरजेचे आहे.

इंदापुर : इंदापूरचे लाडके प्रतिनिधी दर 4 - 5 महिन्यातुन इंदापूरकरांसाठी कोटींचा निधी आणल्याची घोषणा करतात पण त्यातील बराचसा निधी ररस्त्यांवरच पडतो (खर्ची होतो).

इंदापुर तालुक्याला लाभलेल्या लोकप्रतिनिधीनी आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बराचसा निधी इंदापुर तालुक्याला दिला पण त्यांच्याकडे असलेल्या मत्स्य व दुग्ध व्यवसाय खात्याकडून किती निधी आणी योजना आणल्या?

इंदापुर तालुक्याला उजनी बॅक वॉटर लाभले आहे त्यामुळे येथे मुबलक प्रमाणात पाणी आहे यामुळे मत्स्य व्यवसायास मदत होऊ शकते तसेच दुग्ध व दुग्धजन्य व्यवसायास चालनाही मिळु शकते पण अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टींसाठी लोकप्रतिनिधी यांनी काहीही प्रयत्न केलेले दिसून येत नाही, यामागचे काय कारण असावे याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावे.

मत्स्य व दुग्ध व्यवसाय हा थेट लोकांच्या आर्थिक, व्यावसायिक व सामाजिक प्रगती च्या संबंधित आहे, यामुळे तालुक्यातील जनता आर्थिक निर्भर होईल व कदाचित आपल्या लोकप्रियतेला धक्का बसेल असेही लोकप्रतिनीधींना वाटत असेल पण देव करो अन असे न होवो.

सध्या इंदापुर शेजारच्या तालुक्यात ज्याला राजकीय पंढरी म्हणून ओळखले जाते त्या बारामतीत फक्त रस्ते विकास हाच उद्देश न ठेवता वेगवेगळ्या मार्गाने बारामतीचे वैभव व लोकांच्या आर्थिक प्रगतीस हातभार लागेल असे प्रकल्प उभे केले जात आहे, तसेच कण्हेरी या ठिकाणी शिवसृष्टी सारखा प्रकल्प उभा करून पर्यटनास हातभार लावला जात आहे. तसेच तेथील वनीकरणाच्या बाबतीतही वेगवेगळे प्रकल्प राबविले जात आहे. याच्या उलट इंदापुरच्या लोकप्रतिनिधी यांच्याकडे वनीकरण खाते असून व इंदापुरला मोठ्या प्रमाणात वनीकरण लाभले असून असे कोणतेही प्रकल्प राबविताना दिसुन येत नाही.

सध्याच्या लोकप्रतिनिधी यांनी फक्त रस्ते विकास हाच उद्देश न ठेवता तालुक्यातील जनतेच्या आर्थिक व सामाजिक परिस्थिती कशी सुधारेल यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत म्हणजे तालुक्यातील जनता पुढील वेळी आपणावरती मतरुपी आशीर्वाद देऊन पुन्हा आपणास त्यांचे प्रतिनिधीत्व करण्यास संधी देईल.

सध्या सगळीकडे असे बोलले जाते की सर्वच लोकप्रतिनिधी रस्त्यांसाठीच निधी आणतात पण लोकांच्या थेट विकासासाठी प्रयत्न करीत नाही कारण रस्त्याच्या निधीतुन त्यांची टक्केवारी ठरलेली असते व त्यांना असे वाटते की, लोकांना जर आर्थिक सक्षम केले तर आपले स्थान धोक्यात येईल. पण अशा लोकप्रतिनिधींनी लक्षात ठेवावे की जर आपण या गोष्टीत मोडत असाल तर आत्ताच आपणाकडे वेळ आहे कारण आज नाहीतर उद्या जनता तुमच्याकडे या गोष्टींचा जाब विचारेल.

संबधित बातम्या