२० लाख दिव्यांग निधी मंजूर; ५ लाखावरती बोळवण- नांदेड जिल्ह्याचे खासदार मा.प्रतापराव पाटील यांच्या मतदार संघात दिव्यांग झाले बेजार - चंपतराव डाकोरे पाटील.
लोकप्रतिनीधी यांनी संसदेत कायदा करून व निवडणुकीत जाहिर वचन देऊनही अंमलबजावणी होत नसल्यामुळे दिव्यांग, वृध्द, निराधार यांचे होत आहेत हाल.

नांदेड : संसदेत अनेक कायदे सतेत गेलेले खासदार मंजुर केले जातात पण तेच खासदार कायद्याची अंमलबजावणी दिनदुबळ्या जनतेसाठी केली जात नाही?
दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसासारखे जीवन जगता यावे म्हणून शासन अनेक कायदे करून शासन प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे अनेक दिव्यांग वंचित राहात असल्यामुळे भारत सरकारने 2016 ला दिव्यांग कायदा लोकप्रतिनीधी यांनी संसदेत कायदा करून व निवडणुकीत जाहिर वचन देऊन त्याची अंमलबजावणी करीत नसल्यामुळे दिव्यांग, वृध्द, निराधार, मिञ मंडळ, महाराष्ट्र व अनेक संघटनांनी शासन, प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करूनही न्याय मिळाला नाही म्हणून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मा. प्रतापराव पाटील यांना दिव्यांग, वृध्द, निराधार, मिञ मंडळ, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील व पदाधिकारी यांनी निवडणूक मध्ये जाहिर पाठिंबा दिला त्यावेळी जाहीरनामा पांठिबा पञक मध्ये दिव्यांग बांधवांसाठी असलेला खासदार निधी देण्याचे जाहीर आश्वासन चिखलीकर साहेबांनी दिल्यामुळे दिव्यांग, वृध्द, निराधार, मिञ मंडळ, महाराष्ट्र जि. नांदेड च्या कार्यकर्त्यांनी गावोगावी प्रचार करुन बहुमताने सत्तेत पाठविले . पण तिन वर्षाचा अनुशेष सहित दिव्यांग बांधवांचा खासदार निधी नियमाप्रमाणे दरवर्षी विस लाख रुपये प्रमाणे तिन वर्षाचा साठ लाख देण्याऐवजी फक्त पाच लाख रुपये निधी प्रशासनाकडे जमा केला आहे. त्या निधीतून दिव्यांगाना साहित्य देण्याची तरतूद केलेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगानी चालता येत नसल्यामुळे बँटरीद्वारे तिन चाकी सायक़ल मिळावी म्हणून शेकडो दिव्यांनी पडत-झडत जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्याकडे अर्ज सादर केले असता त्याची प्रशासनाने छाननी करुन फक्त 77 दिव्यांगाना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावुन त्यांच्या मुलाखती दि. 8 फेब्रु. 22 घेण्यात आल्या असता नांदेड जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगानी वाहन करून शेकडो रू. खर्च करून पडत झडत मुलाखती दिल्या त्यात फक्त दहा दिव्यांगाना पाच लाख रूपये निधीचा लाभ होईल? जर खासदार साहेबांनी नियमाप्रमाणे दर वर्षी विस लाख रुपये मागील तीन वर्षाचा अनुषेश सहित निधी दिला असता तर दिव्यांगाना त्यांचा हक्क मिळाला असता, पण संसदेत कायदे मंजुर करणारे सत्तेत गेलेले लोकप्रतिनिधीच कायद्याची अंमलबजावणी करीत नसल्याची खंत दिव्यांग, वृध्द, निराधार मिञ मंडळ, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील, जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, राजु शेरकुरवार, ऊमेश भगत, माधवराव डोईफोडे, हानिफ शेख, बालाजी होनपारखे, रामजी गायकवाड, तानाजी कदम, बालाजी राठोड इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध पञकाद्वारे दिली.