महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

इंदापूर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांची 'लबाड लांडग ढोंग करतयं' गाण्याकडे वाटचाल.- राष्ट्रवादी काँग्रेस

राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा )भरणे यांच्या कोट्यावधी रूपयांच्या विकासकामांच्या धास्तीने विरोधक झाले सैरभैर.
इंदापूर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांची 'लबाड लांडग ढोंग करतयं' गाण्याकडे वाटचाल.- राष्ट्रवादी काँग्रेस
March 16, 2021 12:51 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला असून रोजच भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगत आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी कलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी आज चांगलेच प्रत्युत्तर दिले.

इंदापूर तालुक्यातील भाजप नेते व पदाधिकारी यांच्या बेताल वक्तव्याने इंदापूर तालुक्यातील जनतेला 'लबाड लांडग ढोंग करतयं ' गीताची आठवण होते असे म्हणत भाजपला चांगलाच टोला लगावला.

यावेळी बोलताना इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष हनुमंत राव कोकाटे म्हणाले की, तालुक्यातील स्वतःला विद्वान समजणाऱ्या भाजपा पदाधिकारी व नेेत्यानी शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करावे आणि त्या वाचनानंतर थोडेसे चिंतन करावे म्हणजे तथाकथित 'हर घर जल' या योजनेचे विश्लेषण मिळेल.

या परिपत्रकानुसार ही केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त कार्यक्रमाद्वारे योजना राबवली जाणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष आहेत त्या जिल्ह्यातील मंत्री व आमदार त्याचे सदस्य आहेत. यांच्या समितीपुढे हे आराखडे मांडले जातात व ती राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले जातात.

हे सर्व काम या तालुक्याचे नेते राज्यमंत्री नामदार श्री दत्तामामा भरणे यांनी केले आहे ते पुन्हा एकदा तुम्हाला ठणकावून सांगतो. तुम्ही लोकांमध्ये अशा चुकीच्या बातम्या पसरवू नका व प्रत्येक वेळी तुमचं वस्त्रहरण करायला आम्हाला भाग पाडू नका.

स्वतःला विद्वान समजणाऱ्या महाशयांनी मागे सरपंच पदाच्या निवडीवर देखील खोटे दावे केले ते सर्व दावे खोडून काढत आम्ही सर्व सरपंच मीडियासमोर दाखवले तेव्हा कुठे तुमचे वस्त्रहरण झाले व तोंड देखील बंद झाले असे किती वेळा आम्हाला तुमचे वस्त्रहरण करावे लागेल म्हणजे तुमचा खोटा मुखवटा या जनते समोर पुन्हा पुन्हा उघड होईल.

या तालुक्यातील गोरगरीब, मागासवर्गीय, सर्वसामान्य, सुशिक्षित, वयोवृद्ध, युवक, महिला भगिनींनी आदरणीय नामदार श्री दत्ता मामा भरणे यांच्या नेतृत्वावर दोन वेळा शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यांनी असंख्य विकासाच्या अपेक्षा त्यांच्याकडून ठेवलेल्या आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी हे सर्वसामान्यांचं कर्तृत्ववान व क्रियाशील नेतृत्व त्यांच्या सेवेसाठी रात्रीचा दिवस करून झटत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या विविध योजना या इंदापूर तालुक्यात आणत आहेत या सर्व गोष्टीमुळे तालुक्यामध्ये आनंदी व उत्साही वातावरण तयार होत आहे. म्हणून तुम्ही या जनतेवर असल्या विषारी टीका-टिप्पणी चा वापर करत आहात हे योग्य नाही.

जनतेने तुमच्या नेतृत्वला दोन वेळा धडा शिकवला आहे आता तरी सत्याचा मार्ग स्वीकारा व तालुक्यात चौफेर होत असलेला विकास मान्य करा आणि एवढ्या डोळसपणे सर्व खरं बघून सहनच होत नसेल तर किमान डोळे बंद ठेवून तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याचं काम आपण करा. तालुक्याचा विकास करण्यास नामदार दत्तामामा भरणे सक्षम आहेत आणि या तालुक्यातील जनतेचा त्यांच्यावर ठाम विश्वास आहे.

आपल्या तालुक्यातील माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायमस्वरूपी उतरून प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्यासाठी ही योजना मामानी मंजूर करून आणली आहे या माता-भगिनींच्या आशीर्वादाने पुढील विकास कामे देखील आम्ही निश्चित ठणकावून पूर्ण करू आपण फक्त डोळे उघडे व तोंड बंद ठेवण्याचे काम करावे. असेही इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी म्हटले आहे.

संबधित बातम्या