महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

इंदापुरकरांनो काळजी घ्या... हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाही; कोरोना पेशंटच्या वाढत्या पार्श्वभूमीवर इंदापूर आरोग्य यंत्रणेची अवस्था.

खुद्द राज्यमंत्र्यांच्या गावातल्या पेशंटलाही बेड होत नाही उपलब्ध.
इंदापुरकरांनो काळजी घ्या... हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाही; कोरोना पेशंटच्या वाढत्या पार्श्वभूमीवर इंदापूर आरोग्य यंत्रणेची अवस्था.
March 25, 2021 10:06 AM ago Indapur, Maharashtra, India

जिथे राज्यमंत्र्यांच्या गावातल्या पेशंटलाच बेड उपलब्ध होत नाही तिथे आपण 'किस झाड की पत्ती' अशी लोकांत चर्चा होत आहे.

इंदापूर:

आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं आमच्या लाडक्या राज्यमंत्र्यांना सांगून लगेच बेड उपलब्ध करू, पण थांबा!.. कारण खुद्द राज्यमंत्र्यांच्या पीएना फोन करूनही राज्यमंत्र्यांच्या गावातल्या पेशंटलाच बेड उपलब्ध होत नाही त्यात तुम्ही 'किस झाड की पत्ती'.

इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस जनतेच्या बेफिकीरपणामुळे व अशा लोकांवर कडक कारवाई न करण्याच्या इंदापूर प्रशासनाच्या भूमिकेमुळे इंदापूर तालुक्यात कोरोना पेशंटची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे इंदापूर मध्ये हॉस्पिटलमध्ये गर्दी होत असून पेशंट ऍडमिट करून बेड उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे कोरोना संकटामुळे लोकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या असून खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यास लोक धजावत नाही. त्यामुळे बाकी आजाराचे पेशंट व आता कोरोना रुग्णांची संख्या यामुळे शासकीय रुग्णालयात बेडची उपलब्धता होत नाही.

त्यामुळे यावर उपाय म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाची बेड क्षमता वाढविणे व लोकांनी काळजी घेणे. त्यामुळे उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयाची बेड क्षमता लवकरात लवकर वाढवावी अशी मागणी आता तालुक्यातील जनता करू लागली आहे.

याविषयी इंदापुर तालुक्याचे आमदार व राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वाढीव क्षमतेसाठी दि. 23 मार्च 2021 रोजी मा. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मिटिंग झाली असून त्या मध्ये इंदापूर उपजिल्हा रुग्णालयासाठी 100 व ग्रामीण रुग्णालय बावडा व भिगवण येथे 30 नवीन बेड व पद निर्मिती करण्यास मंजुऱ्या मिळालेल्या असून त्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले असून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही होईल.

संबधित बातम्या