महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते 'सुर नवा ध्यास नवा' फेम राधा खुडे हिचा सन्मान.

राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते 'सुर नवा ध्यास नवा' फेम राधा खुडे हिचा सन्मान.
June 16, 2021 05:34 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : तालुक्यातील वालचंद नगर येथील राधा खुडे हिने नुकत्याच पार पडलेल्या 'सुर नवा ध्यास नवा' या रियालिटी शो मध्ये तिसरा क्रमांक पटकाविला याबद्दल इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्यमंत्री सन्माननीय दत्ता मामा भरणे यांनी तिचे कौतुक केले व तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राधा खुडे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे विशेष यश संपादन केले तिने शास्त्रीय संगीत विशारद ही पदवी घेतली असून तिच्या या यशाने तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला. राधा खुडे हीची घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असूनही आईवडिलांनी तिला पदोपदी गायन व संगीत शिकण्यास पाठबळ दिले त्याचे तिने चीज केले, या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून तिचे कौतुक होत असून राज्यमंत्री भरणे यांनी तिचे कौतुक केले व तिच्या पुढील आयुष्य शुभेच्छा दिल्या.

इंदापुर तालुक्याचे लोकप्रिय आमदार व राज्यमंत्री हे नेहमीच माझ्यासारख्या सामान्य कुटूंबातील नवोदित कलाकारांना मदत करीत असतात, त्यांची ही मदत आमच्यासारख्यांना लाख मोलाची वाटते, अशीच मदत ते नेहमी करीत राहतील याबद्दल मी आदरणीय मामांचे आभार मानते. - राधा खुडे

संबधित बातम्या