महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कांदलगावात परसबागांची रूजवणूक करून कृषीदिन साजरा

कांदलगावात परसबागांची रूजवणूक करून कृषीदिन साजरा
July 01, 2021 08:26 PM ago Indapur, Maharashtra, India

कांदलगाव येथे कृषीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. 'साऊ-जिजाऊ' महिला ग्रामसंघ व ग्रामपंचायत कांदलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कांदलगावात 'बीजांकुर' परसबागेचे भूमीपूजन करून उद्घाटन माजी कृषी उपसंचालक प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सरपंच रविंद्र पाटील व ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांच्या संकल्पनेतून परसबागेला 'बीजांकुर' हे नाव देण्यात आले.तसेच ग्रामपंचायत कार्यालयात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. यावेळी सरपंच रविंद्र पाटील,उपसरपंच तेजमाला बाबर, सदस्या रेखा बाबर, कमल राखुंडे, कोंडाबाई जाधव, किसन सरडे, उल्हास पाटील, बाळू गिरी, विजय सोनवणे, दशरथ बाबर, ग्रामसेविका स्वाती चव्हाण, कृषीसहायक वृंदा अवचर, पोलीस पाटील शैलजा पाटील, गावसमन्वयक निलोफर पठाण, उमेद अभियान व्यवस्थापक राणी ननवरे, समन्वयक समाधान भोरकडे, 'साऊ-जिजाऊ' महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा लक्ष्मी कसबे, सचिव स्वाती ननवरे, कोषाध्यक्ष फातिमा शेख, हसीना नायकुडे उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना प्रतापराव पाटील म्हणाले की, गावामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने परसबागा विकसित करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचा कांदलगाव ग्रामपंचायतीचा हा उपक्रम स्तुत्य आहे, त्यामुळे अंगणवाड्या, गर्भवती महिला, किशोरवयीन मुली यांना गावातच शुद्ध आणि सात्विक आहार मिळण्यास मदत होईल व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळेल.

तसेच सरपंच रविंद्र पाटील म्हणाले की, गावामध्ये ग्रामपंचायत तसेच कृषीविभागाच्या वतीने सेंद्रिय शेतीगट स्थापन करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायत विशेष प्रयत्न करणार आहे. परसबागांमुळे बचतगटातील महिलांसाठी उपजीविकेचे साधनही उपलब्ध होणार आहे,तसेच या परसबागांमध्ये देशी व औषधी वनस्पती लावल्या जाणार आहेत.

प्रत्येक परसबागेला बियाणे व रोपे ग्रामपंचायतीकडून उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी दिली. कृषीसहायक वृंदा अवचर यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी उन्नती, महालक्ष्मी, विघ्नहर्ता, आंदुबाई, जागृती, एकता, जयमाता, रघुवीर समर्थ, जोगेश्वरी, पंचशील या बचतगटांनीही परसबागा केल्या. आभार निलोफर पठाण यांनी मानले, तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पांडुरंग इंगळे व संतोष बाबर यांनी प्रयत्न केले.

संबधित बातम्या