महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

भरणे मामांना तालुक्याचा अधिकाधिक सर्वांगीण विकास करता यावा यासाठी जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेला अधिकाधिक वेळ द्यावा.- सतीश भाऊ साबळे

जनतेला अधिकाधिक वेळ देता येत नसल्याची खंत - मा. दत्ता मामा भरणे
भरणे मामांना तालुक्याचा अधिकाधिक सर्वांगीण विकास करता यावा यासाठी जनतेच्या  प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेला अधिकाधिक वेळ द्यावा.- सतीश भाऊ साबळे
March 05, 2022 08:10 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : तालुक्याचे लोकप्रिय आमदार व राज्यमंत्री दत्ता मामा भरणे नेहमीच तालुक्यातील जनतेच्या सर्वच प्रश्नांसाठी अधिकाधिक वेळ देऊन प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण कधी कधी सर्वच लहान प्रश्नांकडे त्यांना वेळ देता येत नाही त्यामुळे त्यांना कधी कधी जनतेचा रोषही पत्करावा लागतो.

सामान्य जनतेसाठी लहानसहान किरकोळ प्रश्नही खुप मोठे असतात त्यामुळे लहान किंवा किरकोळ प्रश्न म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही व त्याकडे वेळेभावी खुद्द मामांनाही लक्ष देता येत नाही त्यामुळे अशा प्रश्नांकडे राष्ट्रवादी काँगेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त वेळ व लक्ष देऊन जनतेच्या प्रश्नांची सोडवून करावी आशा सुचना दत्तामामा भरणे यांनी महाराष्ट्र सोशल मिडियाशी बोलताना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

तसेच यावेळी बोलताना मामा म्हणाले की, जनतेचे प्रश्न व समस्या समजुन घेण्यासाठी रविवारी त्यांच्या भरणेवाडी या गावी जनता दरबाराचे आयोजन केलेले असते या जनता दरबारातही जनतेने येऊन त्यांच्या प्रश्नांसंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करावी जेणेकरून त्यांच्या पातळीवर ते योग्य ती कार्यवाही करून प्रश्न निकाली लावण्याचा प्रयत्न करतील.

यासाठी पोलीस प्रशासन, तालुका व जिल्हा प्रशासन यांसोबत समन्वय साधत जनतेच्या प्रश्नात लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कटिबद्ध राहातील असा विश्वासही दत्ता मामा भरणे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र सोशल मिडीयाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सतीश भाऊ साबळे म्हणाले की, जनतेने लहान व किरकोळ प्रश्न जसे की ट्रॅफिक पोलिसांनी गाडी अडवली, किरकोळ भांडणे, गावातील किरकोळ वाद यासारख्या प्रश्नांवर लगेच मामांना फोन करून कळवणे व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रश्नांवरती आपण लक्ष द्यायला लावणे योग्य नाही. अशा प्रश्नांसंबंधी काही वाद असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर लक्ष घालून अशे प्रश्न मार्गी लावावेत जेणेकरून मामांना तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी अधिकाधिक वेळ देता येईल.

संबधित बातम्या