महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

आम्ही आपल्याला आमचे दैवत मानले होते , मग आपण आमच्याबरोबर असे का वागला?

तुमच्या असल्या गचाळ राजकारणामुळे चांगले , चांगले कार्यकर्ते (हिरे) तुम्ही गमावले आदरणीय मामा जे तुमच्या कडे राहिलेत (चमचे सोडून) त्यांना ह्या पासून दूर ठेवा नाहीतर त्यांची उपजीविकेचे पहा ?
आम्ही आपल्याला आमचे दैवत मानले होते , मग आपण आमच्याबरोबर असे का वागला?
May 25, 2021 05:03 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर तालुक्यातील जनता हताश, निराश आणि दुर्बल झालीय ओ मामा ... कार्यकर्त्यांचा आक्रोश

तुम्हाला आम्ही निवडून दिलं, तुमच्यासाठी घरदार सोडलं आणि आपल्याला फोनवर आमच्याशी बोलू वाटना. बर नका बोलू पण, आम्हां सगळ्या कार्यकर्त्यांना एक सांगा की, तुम्ही आमच्यासाठी काय केलं?

तुमची जबाबदारी म्हणून कोविड सेंटर नुसतीचं सुरु केली. पण तेथे सुविधा निर्माण करायला तुम्ही कमी पडलात. अनेकांचे घरातील व नात्यातील लोक कोविडच्या आजाराने मृत्यू पावले आहेत. काही झालं की, विरोधकांवर खापर फोडायला सुरुवात करता. मामा, लोकप्रतिनिधी तुम्ही आहात विरोधक नाहीत. काहीच न करता नुसती जनतेची दिशाभूल करून दोनवेळा तुम्हाला निवडून दिलेली सर्वसामान्य इंदापूरतील जनता तुमच्याकडे आशेने बघत आहे. ज्यांच्या घरात कोरोनामुळे मृत्यू झाले.त्यांना तुम्ही बधुनों! बधुनों ! म्हणत निवडणुकीच्या वेळी गंडा घालतलाच की ? पण भाबडी गरीब जनता निराश, दुर्बल, आणि हताश झाली आहे. आम्ही त्यांचे हाल स्वतः बघत आहोत. म्हणून त्यांच्यासाठी आज आम्ही तुम्हाला विनंती करतो की, काहीतरी करा. लोकांचा जीव वाचवा. आत्तातरी राजकारण चुलीत घाला.

संबधित बातम्या