महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

निकटवर्तीय व्यक्तींच्या मृत्युने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे अश्रु अनावर; अंथुर्णे येथील युवा डॉक्टर मधुकर रामचंद्र धापटे यांचे कोरोनाने दुःखद निधन.

कोरोना महामारीने निकटवर्तीय व्यक्ती गमावत आहोत सर्वांनी काळजी घ्या कारण रात्र वैऱ्याची आहे - राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांचे भावनिक आवाहन.
निकटवर्तीय व्यक्तींच्या मृत्युने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे अश्रु अनावर; अंथुर्णे येथील युवा डॉक्टर मधुकर रामचंद्र धापटे यांचे कोरोनाने दुःखद निधन.
May 23, 2021 09:34 PM ago Indapur, Maharashtra, India

अंथुर्णे, इंदापुर : राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या निकटवर्तीय व्यक्तीच्या मृत्यूने अंथुर्णे गाव संपुर्ण शोकाकुल झाले असून गावात सर्व व्यवहार बंद करण्यात आले. अंथुर्णे येथील युवा डॉक्टर मधुकर रामचंद्र धापटे यांचा काल रात्री कोरोनावरील उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

मागील महिन्यात डॉ. धापटे यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर त्यांना बारामतीत खासगी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर त्रास वाढल्याने पुण्यातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान हा त्रास कमी न झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

डॉ. धापटे गावातील युवा डॉक्टर होते गावविषयी त्यांना असलेले प्रेम व आपल्या पेशंट विषयी असलेली तळमळ यामुळे गावात सर्वांना ते आपलेसे वाटत होते व अशा व्यक्तीच्या निधनाने संपुर्ण गाव शोकाकुल झाले होते.

मागील महिन्यात 19 एप्रिलच्या दरम्यान डॉक्टर धापटे यांना ताप आला. त्यांनी बारामतीतील वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा करून, त्यांचे मार्गदर्शन घेऊन औषध उपचार घेतला, मात्र ताप कमी होत नसल्याने त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. त्यानंतर देखील ताप कमी होत नसल्याने 23 एप्रिल रोजी पुण्यातील खासगी दवाखान्यात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. 26 एप्रिल रोजी पुण्यातील दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन ते बारामतीत उपचारासाठी दाखल झाले. या दरम्यान मात्र त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्यानंतर पुन्हा त्रास वाढला आणि त्यांना पुन्हा बारामतीतून पुण्यातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांची कोरोनाशी झुंज सुरू होती.

त्यांच्या मृत्यूने भवानीनगर, काटेवाडी, सणसर, अंथुर्णे, शेळगाव, भरणेवाडी परिसरातील नागरिकांना धक्का बसला, तसेच इंदापूर तालुक्यातील बारामती तालुक्यातील डॉक्टरांनीही हळहळ व्यक्त केली.

संबधित बातम्या