महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाव घ्यायला सुध्दा वाटतोय कमीपणा ? --शिवसेना नेते विशाल बोंद्रे यांनी डागली तोफ

असु द्या हे दिवसपण जातील शिवसैनिक भरणेंना योग्य वेळी रस्ता दाखवील..
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाव घ्यायला सुध्दा वाटतोय कमीपणा ?           --शिवसेना नेते विशाल बोंद्रे यांनी डागली तोफ
March 19, 2021 07:08 AM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : सुरेश मिसाळ

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सहीने तालुक्यात भरघोस निधी दिला जात आहे, लगेच मंजूरी व सहीच्या एका फटका-यात निधी दिला जात असताना, इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव सुध्दा घ्यायला कमीपणा वाटायला लागला आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे नेते पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे यांनी केला आहे.

विशाल बोंद्रे म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून 1995 साला पासून लाकडी निंबोडी उचल पाणी परवानगीसाठी तात्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी, महादेव शिवणकर यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही थकलो, रास्तारोको आंदोलन केले, मोर्चे काढले, तरी सुध्दा एकही रुपया निधी आला नव्हता, ठाकरे सरकारच्या काळात त्या कामाला लगेच मंजुरी आणि निधी पण एका सहीच्या फटकाऱ्यात दिला. त्याला दानत लागते, तालुक्यात लाकडी निंबोडी पाणी प्रश्नावर केलेल्या योगदानाबद्दल किमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचं नाव तरी घ्यावे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना ठाकरेंचे नाव घ्यायला कमी पणा वाटत आहे असे आम्हाला वाटत आहे,असे सांगत बोंद्रे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

बोंद्रे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून अजितदादांना सुध्दा निधी आणता आला नाही, तो निधी मोकळ्या मनाने ठाकरे यांनी दिला, अनेक रस्त्याच्या कामाला निधी दिला. सर्वांना माहीत आहे मुख्यमंत्री ठाकरेंच्या सही शिवाय काही होत नाही तरी सुध्दा जाणून बुजून हे घडवल जातंय, पण मतदार हुशार आहे, वीस वीस वर्षे मंत्री पदावर बसलेल्यांना सुध्दा मतदारांनी घरी बसवले आहे, असा उपरोधिक टोला माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना लगावत, अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. महाआघाडीच सरकार असताना इंदापूर तालुक्यात काँग्रेस आणि शिवसेना यांना पद्धतशीर पणे बाजूस ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप विशाल बोंद्रे यांनी केला. आता हे मात्र जनतेच्या लक्षातआले आहे जेव्हा एखादा विचारतो,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एवढा निधी इंदापूर तालूक्यात देतात पण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे साधे आभार तर सोडाच पण नावं सुध्दा घ्यायचं टाळतात ,हे बरोबर नाही, असे भरणेंना ठणकावत, अशा वेळी आम्हाला काय बोलावे असा प्रश्न पडला आहे. असु द्या हे दिवस पण जातील, आम्ही शिवसैनिक योग्य वेळी उत्तर देवू असा इशारा विशाल बोंद्रे यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनाच दिला असल्याने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आता शिवसेनेची नाराजी शमवणार की आपला स्वभाव तसाच ठेवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबधित बातम्या