महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

शहापुर येथील खाजा गरीब नवाज यात्रा यावर्षी रद्द

शहापुर येथील खाजा गरीब नवाज यात्रा यावर्षी रद्द
March 18, 2021 04:16 PM ago Nanded, Maharashtra, India

वसीम शहापुरकर

देगलूर : देगलूर (जि. नांदेड) तालुक्यातील शहापुर येथे दरवर्षी भरणारी खाजा गरीब नवाज बाबांची यात्रा सलग कॉरोनाच्या वाढत्त्या प्रादुर्भाव मुळे यावर्षी रद्द करण्यात आली आहे.

हिंदु-मुस्लीमांच्या एकतेचे प्रतिक असलेली देगलूर तालुक्यातील बाबा यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहापूर येथे दरवर्षी भरणारी बाबांची यात्रा सलग याहीवर्षी रद्द करण्यात आली आहे. यावर्षी ही यात्रा २० मार्च ते २५ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

सध्या जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला उद्रेक पाहता खबरदारीचा उपाय म्हणून तथा साथरोग प्रतिबंधक कायदा तथा आपत्ती व्यवस्थानप कायद्याचा आधार घेत जिल्हाधिकारी डॉ विपीन एटनकर यानी या यात्रेस स्थगिती दिली आहे.

या यात्रेत राज्यासह अनेक आजू बाजूच्या जवळपास सहा ते 10 हजार भाविक येत असतात. वर्तमान स्थितीतच 566 व्यक्तींमागे 25 ते 30 जण देगलूर तालुक्यातील कोरोना बाधीत आढळून येत आहे, यात्रा सुरू ठेवल्यास कोरोनाची बाधा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे हा यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे. गेल्या वर्षी यात्रा रद्द झाल्यानंतरही अनेक भाविक बाबांच्या यात्रेत पोहोचत होते. त्यामुळे पोलिस, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाला मोठी कसरत करून भाविकांना आल्या पावली परत पाठवावे लागेल होते. त्यासाठी शहापूर, खानापूर फाटा येथे पथके तैनात करावी लागली होती.

या पार्श्वभूमीवर बाबांच्या यात्रेच्या काही दिवसां अगोदरच अनुषंगीक आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे व यात्रा रद्द करण्यात आली आहे अशी माहिती दर्गा सेवा समिती प्रमुख सटवा आरोटे यांनी सांगितले आहे तरी मुबई पुणे व इतर अनेक ठिकाणी ऊन येणारे भाविक यांची नोंद घ्यावी.

संबधित बातम्या