महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

पर्यावरण प्रेमी आजीचा अंत्यविधी हि पर्यावरण रक्षण करूनच संपन्न-श्री. सुनील ठाकरे

पर्यावरण प्रेमी आजीचा अंत्यविधी हि पर्यावरण रक्षण करूनच संपन्न-श्री. सुनील ठाकरे
April 08, 2021 09:07 AM ago Yavatmal, Maharashtra, India

दि. 7. महाराष्ट्र सोशल मिडीयाचे राज्य प्रवक्ता मा. श्री. सुनील ठाकरे यांच्या आजीचे दि.6 रोजी दुःखद निधन झाले.

ठाकरे कुटुंबीयांच्या पाच पिढीची साक्षीदार असणारी आजी अनेकदा स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनांचा परामर्श त्यांच्याशी हितगुज करत होती. आणि मुळातच आयुर्वेद आणि जडीबुटी प्रेमी असणारी आजी आपल्या बोलण्यातून पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावणे कसे गरजेचे आहे हे ठणकावून सांगायची. अशा आजीच्या अंत्यदर्शनासाठी प्रभागाचे सन्माननीय नगरसेवक श्री. नीरज भाऊ पवार, आदरणीय नगरसेविका डॉ.सौ. रुपाली ताई जयस्वाल आणि बंधुतुल्य डॉ.पंकज जयस्वाल साहेब आले असता त्यांनी अंत्यविधी हा गोवऱ्या मध्ये करावा अशी कुटूंबियांकडे विनंती केली असता ठाकरे कुटुंबियांना लगेच आजीचे बोल आठवले आणि त्या सर्वांनी त्याला संमती दिली.

याचे पर्यावरण पूरक संकल्पनेची मानव विकास समिती आणि गोरक्षण संस्था आसोली यांनी स्वागत करून शोकसभेत संवदेना व्यक्त करतांना श्री ओम सेठ यांनी जवळपास पर्यावरण रक्षणाची जबाबदारी पार पाडताना शहरातील १६० वा हा अंत्यविधी गोवऱ्यामध्ये होतोय याबद्दल ठाकरे कुटूंबियांचे ऋण व्यक्त करीत स्व.मीरा आजींनी आपल्या मृत्यूनंतर हि सामाजिक दायित्व जपत किमान दोन वृक्ष तोड वाचवत पुढील पिढीसाठी संजीवनी दिली अश्या भावना व्यक्त केल्या

सावडण्याच्या तिसऱ्या दिवसाच्या प्रथेला फाटा देत कोरोनामुळे लवकर जागा मोकळी व्हावी यासाठी आजच दुसऱ्या दिवशी आटोपण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ठाकरे कुटूंबियानी सामाजिक बांधिलकी जपली अशा भावना व्यक्त करत स्वागत केले.

प्रभागाच्या वतीने शोकसंवेदना प्राचार्य लोणकर सर यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमाचे पालन होण्याच्या दृष्टीकोनातून खूप आप्तेष्टांना येण्याची इच्छा असतांना सुद्धा आमच्या विनंती चा मान राखत समजून घेतलं त्याबद्दल आम्ही कायम आपल्या ऋणात असू - शोकाकुल-श्री सुनिल एन. ठाकरे आणि परिवार.

संबधित बातम्या