महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

राज्यमंत्री भरणे यांनी विकासाच्या गप्पा न मारता तालुक्यातील जनतेची विजे अभावी चाललेली होरपळ थांबवावी- ॲड.शरद जामदार

शेतकरी देशोधडीला आणि विकासाच्या गप्पा असे इंदापुरातील सध्याचे वातावरण झाले असून अनेक विकासाच्या फसव्या घोषणा केल्या जात आहेत
राज्यमंत्री भरणे यांनी विकासाच्या गप्पा न मारता तालुक्यातील जनतेची विजे अभावी चाललेली होरपळ थांबवावी- ॲड.शरद जामदार
March 17, 2021 03:13 PM ago Indapur, Maharashtra, India

अगदी लाईट बिल माफ होणार कोणावरही अन्याय होणार नाही अशा अनेक पोकळ घोषणा वेगवेगळ्या पत्रकार परिषद सभांमधून ते करीत होते.

प्रतिनिधी अहमद शेख

इंदापूर: शेतकरी देशोधडीला आणि विकासाच्या गप्पा असे इंदापुरातील सध्याचे वातावरण झाले असून अनेक विकासाच्या फसव्या घोषणा केल्या जात आहेत मात्र लाईट बिलांचा इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा याविषयीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. कोरोना महामारी संकटात शेतकऱ्यावर हे संकट लादले असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला असून ते हैराण झाले आहेत जनतेची विजे अभावी चाललेली होरपळ थांबवावी असे भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी म्हटले.

ॲड.शरद जामदार म्हणाले की, शेतकऱ्यांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून इंदापूर तालुक्यासाठी कोणतेही शाश्वत तरतूद किंवा न्याय मदत नाही उलट त्यावर जबरदस्तीने त्यांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्याला महाविकास आघाडीतील हे राज्यमंत्री सहकार्य करीत असल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

अगदी लाईट बिल माफ होणार कोणावरही अन्याय होणार नाही अशा अनेक पोकळ घोषणा वेगवेगळ्या पत्रकार परिषद सभांमधून ते करीत होते शेतकरीही या आश्वासनाला बळी पडून आपल्यावर वीजबिलाची टांगती तलवार टाकली जाणार नाही यासाठी ते निश्चित होते परंतु अधिवेशन संपताच त्यांनी आपला खरा चेहरा लोकांसमोर आणला.

अशाही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशिष्ट प्रकारची तरतूद करून लाईट तोडणी कसे लांबवता येईल यावर मार्ग कसा काढता येईल हे प्रयत्न न करता हे बेजबाबदार राज्यमंत्री मात्र तालुक्यात विकासासाठी किती कोटी रुपये आणले हे चर्चा करीत राहिले मात्र अगोदरच कोरणा संकट, अतिवृष्टीचे संकट आशा मधून सध्याच्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विज तोडीच्या संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. गावाची विज, शेतीची वीज, पाणी पुरवठ्याची वीज या सगळ्यांच्या गोंधळात तालुक्याची वाटचाल अंधारमय दिशेने होत असुन शेतीच्या उत्पादनावर याचा प्रतिकूल परिणाम होणार असल्याने शेतकरी पुढील काळात अधिकच आर्थिक अडचणीत सापडणार आहे. हे पाप तालुका प्रतिनिधी म्हणून ते घेणार का हा खरा प्रश्न आता निर्माण झाला आहे.'

संबधित बातम्या