महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

सरडेवाडीत विविध अभिनव उपक्रमांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मानवंदना

सरडेवाडीत विविध अभिनव उपक्रमांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मानवंदना
May 31, 2021 08:48 PM ago Indapur, Maharashtra, India

सरडेवाडी : येथे राजमाता अहिल्यादेवींची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय सरडेवाडी येथे राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सिताराम जानकर व उपसरपंच हनुमंत जमदाडे यांनी केले.

यावेळी ग्रामपंचायत सरडेवाडी व सरपंच सिताराम जानकर मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भगवानराव भरणे पतसंस्थेचे चेअरमन मधुकरमामा भरणे यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच सरडेवाडी गावात मुख्य चौकात पिवळा ध्वज उभारून अहिल्या चौक व अहिल्यानगर असा नामविस्तार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सम्राट मौर्य सेनेचे प्रदेश अध्यक्ष अर्जुन सलगर, जि. प. सदस्य अभिजीत तांबिले, पंचायत समिती सभापती सौ.स्वाती शेंडे, पं.स. सदस्य सतीश पांढरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे व तालुकाध्यक्ष सतीश शिंगाडे, यश उद्योग समूहाचे दिपक जाधव, वरकुटे गावचे सरपंच बापूसाहेब शेंडे उपस्थित होते.

यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर विकास प्रतिष्ठानची देखील स्थापना करण्यात आली व नामफलकाचे उद्घाटन जि.प.सदस्य अभिजीत तांबिले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी नवनाथ कोळेकर यांची निवड करण्यात आली.यावेळी बोलताना आप्पासाहेब माने म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी व विधायक उपक्रम आम्ही हाती घेणार आहोत, ज्याचा समाजातील गोरगरीब लोकांना उपयोग होईल.यावेळी ग्रामपंचायत सदस्य रविंद्र सरडे,गोकुळ कोकरे, सतीश चित्राव, सुप्रिया कोळेकर, वैशाली कोळेकर, प्रियंका शिद, वैशाली शिद,अलका कडाळे, गयाबाई तोबरे अंगणवाडी सेविका अलका ढावरे, दक्षता ढावरे, छाया कदम, प्रियंका शिंदे उपस्थित होत्या.

यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात एकूण १३१ बॅग्ज संकलित झाल्या, रक्तदान शिबिरात लक्ष्मी राजेंद्र सलगर (वय४५) व कल्पना दशरथ जानकर (वय५०) या महिलांनीदेखील रक्तदान केले व इतर महिलांपुढे आदर्श ठेवला, आयोजकांकडून प्रत्येक रक्तदात्यास पाण्याचा जार भेटवस्तु म्हणून देण्यात आली.

यावेळी, किरण गोफणे, अभिजीत तांबिले, सरपंच सिताराम जानकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सरडेवाडी गावातून अनेक लहान मुली स्वयंप्रेरणेने राजमाता अहिल्यादेवींच्या वेशभूषेत कार्यक्रम स्थळी दाखल झाल्याने कार्यक्रमात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. तेजस्वीनी मारुती कोळेकर या लहान मुलीने उत्कृष्ट भाषण केले. अध्यक्षीय भाषणात प्रदिप गारटकर म्हणाले की, आज सरडेवाडीत गावात राजमाता अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेले सर्व उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत, अशा उपक्रमांनी जयंती साजरी करणे ही काळाची गरज आहे,तरच अहिल्यामातेला अभिप्रेत असलेले लोककल्याणकारी सुराज्य निर्माण होईल. कार्यक्रमास राजाराम सागर, मारुती कोळेकर, लक्ष्मण देवकाते, बळीराम जानकर, उपस्थित होते. सर्व उपक्रम कोविड नियमांचे पालन करून घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन आप्पासाहेब माने यांनी केले तर आभार प्रदर्शन सरपंच सिताराम जानकर यांनी केले.

संबधित बातम्या