महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

बारामती-कळंब-बावडा-नरसिंहपूर (BKBN) रस्त्याचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय( मामा) भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न

बारामती-कळंब-बावडा-नरसिंहपूर (BKBN) रस्त्याचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय( मामा) भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न
March 21, 2021 12:17 PM ago Indapur, Maharashtra, India

निमसाखर गावासाठी हर हर जल योजनेअंतर्गत १५ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल निमसाखर ग्रामस्थांनी नामदार श्री भरणे मामा यांचा पुष्पहार घालून जाहीर सत्कार केला.

निमसाखर(इंदापूर) : गेली कित्येक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या बारामती-कळंब-बावडा-नरसिंहपूर (BKBN) रस्त्याचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय( मामा) भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी निमसाखर गावाच्या पाणी योजनेसाठी हर घर जल योजनेअंतर्गत १५ कोटी निधी मंजूर केल्याबद्दल नामदार श्री भरणे मामा यांचा निमसाखर ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार घालून जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नामदार श्री. भरणे मामा यांनी तालूक्यातील विरोधकांच्या टिकेचा संदर्भ घेताना इंदापूर तालुक्यातील जनतेने नाकारलेल्या अपयशी नेतृत्वाच्या डोक्यावर मंत्रिपदाचा लाल दिवा होता. त्या लाल दिव्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी न करता स्वत:ची प्रसिध्दी करण्यात व सगेसोयरे यांना मोठे करण्यात घालवल्याने इंदापूर तालुक्यातील माय बाप जनतेने एकदा नव्हे तर दोनदा अपयशी नेतृत्व म्हणून घरी बसवून त्यांना विश्रांतीचा प्रेमळ सल्ला दिला तरीही इंदापूर तालुक्यातील झपाट्याने होत असलेला विकास पाहून स्वतःच्या राजकीय भवितव्याची चिंता लागलेले विरोधक खोटे व बेताल वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. त्यांना तालुक्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी बांधव तसेच सर्वच घटकांसाठी खुप काही करता आले असते परंतु त्यांना ते करता आले नाही म्हणूनच ती संधी येथील जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिली आहे. मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार साहेब, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी व इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी करत असल्याने सध्या काहीच काम नसलेल्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकु लागल्याने उदिग्न होऊन ते टिका करण्यात धन्यता मानत आहेत असल्याचे सांगून नामदार श्री भरणे मामा यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला.

रस्त्याचे काम लवकरात लवकर तसेच दर्जेदार होण्यासाठी स्वतः मी जातीने लक्ष घालणार असल्याचे सांगून इंदापूर तालुक्यातील विकासासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करणार असल्याचे नामदार श्री. भरणे मामा यांनी जाहीर केले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री हनुमंत कोकाटे पाटील, जेष्ठ नेते श्री दत्तात्रय घोगरे, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.अभिजीत (भैय्या) रणवरे पाटील, श्री नंदकुमार रणवरे पाटील, कार्याध्यक्ष मा.अतुल (शेठ) झगडे, जिल्हा नियोजन समातीचे सदस्य मा.सचिन(दादा) सपकळ, युवा नेते मा.विरसिंह (भैय्या) रणसिंग, निमसाखरचे सरपंच मा.धैर्यशिल रणवरे, मा.सरपंच श्री सुरेश लवटे, शिवाजीराव पानसरे, राम रणसिंग, विनोद रणसिंग, संतोष रणवरे, दिपक लवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबधित बातम्या