महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत, तर शाळा बंद असल्याने पालक चिंतेत - गजानन पाटील चव्हाण

बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत, तर शाळा बंद असल्याने पालक चिंतेत - गजानन पाटील चव्हाण
July 06, 2021 02:43 PM ago Nanded, Maharashtra, India

गरीबाच्या मुलांचे भविष्य धोक्यात शासनाचे ऑनलाईन भ्यास काही दिसेना:; स्मार्ट मोबाईल गरिबांना मिळेना

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पेरणी करून मोकळे झाले असले तरी अनेक दिवसापासून पाऊस नसल्याने महागाईचे बियाणे टाकून आता पुढे काय होणार पाऊस पडत नसेल तर अशा विचार चक्रात हतबल झालेले शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

शेतकरी वर्ग खरीप हंगाम काळात काही 3000 रूपयेची सोयाबीनची बॅग 4000 रूपयेला घेऊन दुबार पेरणी केली. एकरी दहा हजार रुपये पहिले खर्चाचे व नंतर विस हजार रुपये खर्च करून शेतकरी शेतात खर्च केले पण पाऊस पडत नाही. पाऊसाची वाट आतुरतेने बघतोय तसेच जगामध्ये व देशात कोरोणाने थैमान घातले दुसरी लाट महाराष्ट्रा मध्ये जोरच धरली त्यामध्ये तिसरी लाठ येणार या भीतीने नांदेड जिल्हात निर्बंध घालण्यात आले. त्यामध्ये शाळा बंदच लहान मुलाच्या भविष्यात शिक्षणाची वाटचाल धोक्यातच जात आहे.

दोन वर्षापासून सतत लाॅकडाऊन चालूच आहे. जे लहान मुलं अ, आ, ई, काढून आपलं भविष्य घडवायचे ते आता लाॅकडाऊन मुळे त्याच्या होटावर फक्त कोरोणाच आहे. गरीबांचे तर हालच हाल सुरू आहेत,कारण स्मार्ट मोबाईल का मिळत नाही शासनाचे ऑनलाईन भ्यास काही दिसत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गरीबाच्या हाताचे काम गेले. कंपणी बंद, काम धंदा बंद, आपल्याच लोकानी थोडे का होय ना अन्नधान्याची सोय करून ते देते वेळी फोटो काढण्यामध्ये मग्न काहो जनता कुठलाच विचार न करता अन्नदान करणार्या सोबत फोटो काढून घेतले. पोठासाठी आणि देणारा चिरंतन झरा व्हाट्सएप, फेसबुक वर टाकून आपली स्वताच्या पाठीवर हाथ थोपवून घेत होता. ह्या कोरोणा आजाराने अनेक धनदांडग्या लोकाचा जीव गेला तोंडात पाणी सुध्दा टाकण्याची घरच्या लोकांना परवानगी नव्हती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि समोर आजून किती संकट येथील यांची कोणालाच कल्पना नाही.

शासनाने विचार करून बळीराजाना दिलासा देण्यासाठी सहकार्य करावे व सर्व सुविधा पुरवून शाळादेखील चालू कराव्यात जेणेकरून मुलांचे भविष्य बरबाद होणार नाही याकडेही शासनाने लक्ष देणे अत्यंत आवश्यक गरजेचे आहे.

संबधित बातम्या