योगेशजी बहल हे कोरोना काळात जनतेसाठी लढा देणारे खरेखुरे योध्ये - लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स
लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली योगेशजी बहल यांच्या कार्याची दखल

योगेशजी बहल यांचा लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स ने सन्मान केला, या सन्मानाबद्दल महाराष्ट्र सोशल मिडीयाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. सतीश भाऊ साबळे तसेच बारामती येथील उद्योजक मा. राकेश कपुर साहेब यांनी अभिनंदन केले.
पिंपरी (प्रतिनिधी) - कोरोना सारख्या जागतिक महामारीत प्रत्येक जण आपापली काळजी घेत असताना काहीजण आपली काळजी विसरून लोकांच्या कल्याणासाठी झटत असतात अश्याच योध्यापैकी एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे माजी महापौर योगेशजी बहल.
योगेशजी बहल यांनी अध्यक्ष असलेल्या ईश्वरदास बहल चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे च्या माध्यमातून कोरोना सारख्या महामारीत लोकांची निरपेक्ष मदत करीत त्यांना लोकांना या कठीण परिस्थितीत आधार दिला.
त्यांच्या याच कार्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने बहल यांचा नुकताच गौरव केला आहे.
ईश्वरदास बहल चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, या संस्थेचे अध्यक्ष तसेच पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर योगेश मंगलसेन बहल यांना लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे 'सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट' हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
कोरोना संकटकाळात रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या कोव्हीड योद्धयांना हे प्रमाणपत्र दिले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) निर्देश केल्याप्रमाणे करोना व्हायरस रोगाच्या सर्वोत्तम प्रतिबंधासाठी मार्गदर्शन तसेच कार्य करणाऱ्या योगेश बहल यांना हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
योगेशजी बहल यांच्या या सन्मानाबद्दल महाराष्ट्र सोशल मिडीयाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. सतीश भाऊ साबळे, तसेच बारामती येथील उद्योजक मा. राकेश कपूर साहेब यांनी ही अभिनंदन केले.