महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

२९६ रोपांची वृक्षलागवड करून कांदलगावात पुण्यश्लोक अहिल्यामातेस अभिवादन

२९६ रोपांची वृक्षलागवड करून कांदलगावात पुण्यश्लोक अहिल्यामातेस अभिवादन
May 31, 2021 02:58 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापुर : ग्रामपंचायत कांदलगावच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच श्री. रविंद्र पाटील आणि उपसरपंच तेजमाला बाबर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

यावेळी रेखा बाबर, किसन सरडे, कोंडाबाई जाधव, कमल राखुंडे, उल्हास पाटील, विजय सोनवणे, बाळू गिरी, पोलीस पाटील शैलजा पाटील, दशरथ बाबर, ग्रामसेविका स्वाती चव्हाण उपस्थित होत्या. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने २९६ रोपांची वृक्षलागवड संंपूर्ण गाव परिसरात करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी दिली. यामध्ये सावली देणारे वृक्ष कडुलिंब, करंज, शिसव, शमी, चिंच, जांभूळ, वड, पिपंळ अशा रोपांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना सरपंच श्री.पाटील म्हणाले की, आज राजमाता अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी विचार समाजात रूजवण्याची नितांत गरज आहे. सध्या कोविड काळात सगळीकडे ऑक्सिजन तुटवडा जाणवत आहे, त्या पार्श्वभूमीवर राजमाता अहिल्यादेवी जयंतीचे औचित्य साधून गावात २९६ रोपांची वृक्षलागवड करण्याची संकल्पना आम्ही अमंलात आणत आहोत, जेणेकरून भविष्यात कांदलगाव स्मार्टग्राम बरोबरच एक ऑक्सिजन हब म्हणून पुढे येईल व प्रदूषणमुक्त व पर्यावरण संतुलित गाव म्हणून कांदलगावची ओळख होईल.

आभार प्रदर्शन पांडुरंग इंगळे यांनी केले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष बाबर यांनी प्रयत्न केले.

संबधित बातम्या