महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

करमाळा तालुका व इंदापूर तालुक्यातील स्नेहाचे-मैत्रीचे नाते दृढ करणार (मिले सूर मेरा तुम्हारा) : राज्य मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.दत्तामामा भरणे

राज्य मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते डिकसळ गाव ते जुना ब्रिटीश कालीन रेल्वे ब्रिज कामासाठी दोन कोटीची मंजुरी .
करमाळा तालुका व इंदापूर तालुक्यातील स्नेहाचे-मैत्रीचे नाते दृढ करणार (मिले सूर मेरा तुम्हारा) : राज्य मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.दत्तामामा भरणे
June 20, 2021 01:47 PM ago Solapur, Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मिडिया : डिकसळ गाव ते जुना ब्रिटीश कालीन रेल्वे ब्रीज पर्यंतच्या दोन कोटी मंजुरीच्या रस्त्याचे भुमिपुजन आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे( मामा), बारामती ॲग्रोचे चेअरमन मा. राजेंद्रदादा पवार, जिल्हा परिषद सदस्या सौ. सविताराजे भोसले( वहीनी), माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रदीपजी गारटकर, पंचायत समिती सदस्य नागेशकाका लकडे, संतोष वारे व पश्चिम भागातील सर्व पक्षांचे, गटांचे मान्यवर पदाधिकारी व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी भिगवण व परिसरातील ग्रामस्थ ही उपस्थित होते.. वस्तुस्थितीने हा रस्ता इंदापुर तालुक्यात येत असला तरी तो आपल्या करमाळा तालुक्याच्या दृष्टीने खुप महत्वाचा रस्ता आहे. याप्रसंगी उपस्थित मंत्री- महोदय आणि मा. राजेंद्रदादा पवार यांनी या रस्त्याचे महत्व विषद करताना करमाळा तालुक्यातील आजी-माजी आमदार यांचेसह सर्वांचीच या रस्त्याची मागणी होती. हे आवर्जुन नमुद केले.तसेच राजेंद्रदादा पवार यांनी सतत पाठपुरावा केला याची माहीती देखील पालकमंत्र्यानी दिली..

राजेंद्रदादांनी देखिल गेल्या पंचवार्षिक काळात माजी. आमदार नारायण आबांनी केलेले रस्ते पाहता इंदापुर तालुका हद्दीतील हा रस्ता तातडीने होणेसाठी प्रयत्न करत होतो असे आवर्जुन सांगितले. या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाचीच गेली अनेक वर्षांची मागणी आज सत्यात उतरली आहे. नक्कीच या रस्त्यांमुळे करमाळा तालुका व इंदापुर तालुक्यातील स्नेहाचे- मैत्रीचे नाते दृढ होणार आहे. जे काम करतील त्यांचे कौतुक तर नक्कीच जनता करणारच आहे. पश्चिम भागातील रस्त्यांवरून होणारा खडतर प्रवास आज सुखकर होतोय. माजी. आमदार नारायण (आबा) पाटील, जिल्हा परिषद सदस्या वहीनीसाहेब तसेच पश्चिम भागातील सर्वच ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळींनी पश्चिम भागातील रस्त्यांसाठी खुप प्रयत्न केले. त्यामुळे सुसज्ज रस्त्याचे जाळे निर्माण झाले. पुढील काळातही पश्चिम भागातील काही रस्त्यांची, पुलांची कामे होणे आवश्यक आहेत... डिकसळ पुला साठी महत्वाचा निधी मिळणे अत्यंत गरजेचे असुन खातगाव जवळील दोन पुलांसाठी देखिल निधी आवश्यक आहे. यासाठीची मागणी जोर धरत असुन नक्कीच विकासाचे कामी राजकारण न करता पाठपुरावा केल्यास नक्कीच अनेक राजमार्ग तयार होतील विकासाचे--राजमार्ग.

यावेळी करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक मान्यवर यांची आवर्जुन उपस्थिती होती.. पश्चिम भागातील युवक नेते केत्तुरचे माजी सरपंच ॲड. अजित विघने, प्रा. रामदास झोळ सर,सुहास गलांडे सर, डॉ. गोरख गुळवे, लतिश लकडे, अनिल गलांडे, नंदकुमार भोसले, हनुमंत धायगुडे, रामदास गुंडगिरे, महादेव नवले, पै. सुनिल गोडसे, सागर दोडमिसे, गणेश घोरपडे, व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

संबधित बातम्या