महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

भरणे मामांच्या माध्यमातून बाभुळगाव चा कायापालट झाला - हनुमंतराव कोकाटे-पाटील

भरणे मामांच्या माध्यमातून बाभुळगाव चा कायापालट झाला - हनुमंतराव कोकाटे-पाटील
July 01, 2021 08:55 AM ago Indapur, Maharashtra, India

इंदापुर : सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार श्री.दत्तात्रय (मामा) भरणे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना ते आज तागायत बाभुळगाव च्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करून कोट्यावधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत, त्यामुळेच आज बाभुळगाव विकासाच्या बाबतीत अग्रेसर असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे-पाटील यांनी सांगितले.

लाडक्या खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदरणीय भरणे मामांच्या माध्यमातून जलसंधारण विभागा अंतर्गत २० लाखांचे २ बंधारे व नागोबा मंदिर येथे सभामंडप (१० लक्ष) अशा जवळपास ५० लक्ष रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री.मधूकर (मामा) भरणे यांच्या शुभहस्ते व तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

या कार्यक्रमास कार्याध्यक्ष अतुल (शेठ) झगडे, पंचायत समितीचे सदस्य सतिश (गोटू) पांढरे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ (आबा) रूपनवर, इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे-पवार, माजी सरपंच संजय देवकर, विलास चव्हाण, टिपाले महाराज, शिवाजी जगताप, आबा पाटील, महादेव मिसाळ, राष्ट्रवादी चे सरचिटणीस सुभाष डरंगे-पवार यांच्या सह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी बोलताना हनुमंतराव कोकाटे-पाटील म्हणाले की, बाभुळगाव वर विकासाच्या बाबतीत आदरणीय भरणे मामांचे विशेष लक्ष आहे, त्यामुळेच या गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून, निधी देण्यात आदरणीय भरणे मामा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुस भर कमी पडणार नाही मात्र बाभुळगाव करांनी सुद्धा आगामी काळात भरणे मामांवर अजून थोडसं प्रेम करावे, कारण माजी लोकप्रतिनीधीला साधा ५० हजार रूपयांचा मुरूम टाकायला सुध्दा अधिकार राहिलेला नाही. तसेच त्यांच्या हातात असलेल्या सहकारी संस्थांची काय परिस्थिती झालेली आहे, हे उभ्या तालुक्याला माहित आहे. त्यांनी २० वर्ष फक्त जॅकेट बदलण्यात आणि बाॅडीगार्डच्या गराड्यातच घालवली, मंत्रीपदाच्या धुंदीत तालुक्याकडे आणि सामान्य जनतेकडे साफ दुर्लक्ष केले. या उलट आदरणीय मामांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात होत असलेली विकास कामे उभा तालुका पाहतोय.

भरणे मामा रात्र-दिवस आपल्या तालुक्यातील जनतेसाठी काय आणता येईल याचा प्रयत्न करत असतात, म्हणून तर *२०१४ ते २०१९ या काळात विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील आदरणीय अजितदादा पवार सो व आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय भरणे मामांनी तब्बल १३०० कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावली असल्याचे कोकाटे आबांनी ठणकावून सांगितले.

आता तर आदरणीय भरणे मामा कर्तृत्ववान मंत्री म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित झालेले आहेत, आपल्याकडे तब्बल ६ वेगवेगळी महत्त्वाची खाती आहेत. त्यामुळे तुम्ही नुसतं बघत रहा, भरणे मामांच्या माध्यमातून विकासा कामांसाठी प्रचंड प्रमाणात निधी येत आहे.आपण रोज जरी उद्घाटने घेतली तरी पाच वर्ष कमी पडतील इतका निधी आपल्याला मिळत आहे असे तालुकाध्यक्षांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या जोरदार कडकडाटात दाद दिली.

तसेच या वेळी बोलताना माजी सरपंच संजय देवकर म्हणाले की, आमच्या बाभुळगाव साठी आदरणीय भरणे मामांनी आम्ही मागितला त्यापेक्षा जास्त निधी दिला असताना २०१९ च्या विधानसभेला आम्ही कमी पडलो, परंतु यंदाच्या निवडणुकीत बाभुळगावातून आदरणीय भरणे मामांना लीड दिल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ह.भ.प टिपाले महाराज यांनी केले व आभार सुभाष डरंगे यांनी मानले.

संबधित बातम्या