महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने सुपे येथे ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष नितीन दादा शेंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न

मा. उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात वृक्षारोपण सप्ताह आयोजित.
बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने सुपे येथे ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष नितीन दादा शेंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न
1 y 10 m 16 hrs 43 min 55 sec ago Baramati, Maharashtra, India

सुपे, बारामती : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल च्या सूचनेनुसार राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात वृक्षारोपण सप्ताह आयोजित करण्यात आला होता त्यानुसार बारामती तालुक्यातील सुपे येथे वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे, बारामती पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्य सौ निता ताई बारवकर, बारामती मार्केट कमिटीचे माजी सभापती व विद्यमान संचालक श्री शौकत भाई कोतवाल, गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ स्वाती ताई हिरवे, ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीज्ञानेश्वर बापू कवले, माजी जिल्हा परिषद सदस्य बीके भाऊ हिरवे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री दादा राम झगडे, तालुका संघटक पैलवान आप्पासो तिडके, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष श्री सुशांत जगताप, पुणे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष श्री अनिल लडकत वृक्षारोपण करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल उपाध्यक्ष श्री तुषार हिरवे व जिल्हा सरचिटणीस श्री प्रतिक सुपेकर, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ऑफिस सेल उपाध्यक्ष श्री गणेश पवार, श्री महेश चांदगुडे, श्री अशोकराव लोणकर सर, जयराम कुंभार, मुनीर भाई दफेदार, सागर तेली, राजूभाई तांबोळी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबधित बातम्या