महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

इंदापुरात 2024 साठी बाबीरबुवा कोणाला पावणार; कार्यकर्त्यांमध्ये रंगली चुरस; आपापल्या लाडक्या नेत्याला कौल.

कोणाचा पारडं जड! माजी आमदार की विद्यमान आमदार
इंदापुरात 2024 साठी बाबीरबुवा कोणाला पावणार; कार्यकर्त्यांमध्ये रंगली चुरस; आपापल्या लाडक्या नेत्याला कौल.
October 28, 2022 09:10 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर: येथील रुई गावामध्ये बाबीरबुवा ची यात्रा महोत्सव अतिशय उत्सवात साजरा केला जातो, या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे इंदापूर चे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले विद्यमान आमदार दत्ता मामा भरणे व भाजपात प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यात्रेनिमित्त पारंपरिक ढोल वाजवितानाचे व्हिडियो व्हायरल झालेले पहायला मिळाले यानिम्मिताने राजकीय कार्यकर्त्यांना आपापल्या लाडक्या नेत्याचं ढोल वादन पाहून आणखीनच हुरूप आला व 2024 च्या निवडणूकीत कोणाचा गुलाल उधळला जाणार याची चर्चा रंगली.

इंदापूर मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये राजकीय उत्साह नेहमीच पाहायला मिळतो, एकेकाळचे राजकीय लागेबंध असणारे व सद्याचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे दत्ता मामा व हर्षवर्धन पाटील 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकुन उभे आहेत, त्यामुळे ते मतदारसंघात जास्तीत जास्त कामे करून जनतेच्या मनात कसं घर करता येईल याकडे दोघांचं लक्ष असतं, पण जनता मात्र हुशार आहे ती बरोबर ठरवते की कोणाला निवडून आणायचं अन कोणाला पाडायचं.

इंदापूर विधानसभा मतदार संघात 2014 पासून दत्ता मामाचं नेतृत्व तालुक्यातील जनतेनं स्वीकारल व 2019 च्या निवडणुकीत दत्ता मामाच्या पारड्यात राज्य मंत्री पद पडलं. त्यानंतर मामांनी कामाचा धडाका लावत इंदापुरचा कायापालट केला. 2014 च्या निवडणुकी पूर्वी इंदापूर विधानसभा सध्याचे भाजपवासी व पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे हर्षवर्धन पाटील उर्फ भाऊ यांचा बालेकिल्ला होता पण राजकीय खेळीमुळे तो मतदार संघ राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्ता मामा भरणे यांनी काबीज केला त्यामुळे तो संघ परत मिळवण्यासाठी हर्षवर्धन पाटील जोमाने कामाला लागले आहेत.

सध्या राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार आहे त्यामुळे आत्ता भाजपवासी असलेले हर्षवर्धन पाटील यांना हा गड काबीज करण्यासाठी मोठी रसद मिळत आहे, त्यामुळे एकेकाळी राष्ट्रवादी च्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना निवडणून येण्यात हर्षवर्धन पाटील यांचा मोठा वाटा होता. पण हर्षवर्धन पाटील भाजपात गेल्याने सध्या बारामती लोकसभा मतदार संघात चिंतेचे वातावरण पाहायला मिळते.

दत्ता मामा अजित दादांचे व सुप्रिया सुळेंचे खास व निकटवर्तीय समर्थक मानले जातात त्यामुळे त्यांच्याकडे बारामती लोकसभा मतदार संघाबरोबर इंदापूर विधानसभेचीही जबाबदारी पडली आहे. त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना मामा दिसत आहे. त्यामुळे या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत, वेळ काढून मामा मतदार संघात कामाचा आढावा घेत सामाजिक भान व परंपरा जपताना दिसत आहे. त्यामुळे इंदापूर मतदार संघात अतिशय जोरदार चुरस पाहायला मिळत आहे की, आपल्या लाडक्या नेत्याच पारडं पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात कस जड राहील याचं साकडं बाबीरबुवाला घालताना पाहायला मिळाले.

त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचा गुलाल आम्हीच उधळणार असे माजी व विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या चर्चा चांगल्याच रंगल्या गेल्याच पाहायला मिळालं.

संबधित बातम्या