हर्षवर्धन पाटील यांनी केले समाधान आवताडे यांचे अभिनंदन
इंदापूर प्रतिनिधी: अहमद शेख
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी विजय संपादन केल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ही निवडणूक ऐतिहासिक अशी होती या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद असे यश मिळवले असून या यशाबद्दल समाधान आवताडे यांचे अभिनंदन.
पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघातील जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठाम उभी राहिली असून या विजयाबद्दल तेथील मतदारांना देखील अभिनंदन आणि शुभेच्छा.
राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली असून या निवडणुकीने विजयी अशी वाटचाल केली आहे.