महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

पोकळ सल्ले देणाऱ्यांसाठी, ही छोटीसी बोधकथा

सल्ले नको, साथ द्या!!! मदतीचा हात द्या!!!
पोकळ सल्ले देणाऱ्यांसाठी, ही छोटीसी बोधकथा
May 15, 2021 10:36 AM ago Baramati, Maharashtra, India

एकदा एक पक्षी चोचीने समुद्रातील पाणी बाहेर काढत होता.

दुसऱ्या पक्षाने विचारलं - भाऊ तू हे काय करतो आहेस ?

पहिला पक्षी बोलला- या समुद्राने माझी पिल्लं बुडवलीत. आता तर मी या समुद्राला सुकवूनच टाकतो.‌

हे ऐकून दुसरा पक्षी बोलला- अरे भावड्या तुझ्याकडनं कसा काय सुकेल समुद्र ? तू एवढासा जीव अन् समुद्र एवढा विशाल. तुझं तर संपूर्ण आयुष्य अपूरे पडेल यासाठी.

तर पहिला पक्षी बोलला - दादा! द्यायची तर साथ दे, फक्त सल्ले नकोत.

हे ऐकून दुसरा पक्षी पण साथ द्यायला लागला. असे हजारो पक्षी येत गेले व दुसऱ्यांना सांगत गेले की, सल्ले नकोत साथ पाहिजे.

हे पाहून विष्णुदेवाचं वाहन गरुड पण ह्या कामासाठी जायला निघाला.

विष्णु देव म्हणाले अरे तू कुठे चाललास ? तू गेलास तर माझं काम खोळंबेल. अन् तसंही तुम्हा सर्व पक्ष्यांकडून समुद्र काही सुकला पण जाणार नाहीये.

गरुड बोलला - देवा सल्ला नको साथ द्या.

मग काय, हे ऐकून विष्णुदेव पण समुद्र सुकवायसाठी पुढे आले. विष्णु देवाला पाहून समुद्र घाबरला आणि त्याने त्या पक्षाची पिल्लं परत केली.

ह्या संकट समयी आपल्या देशाला देखील आपला सल्ला नको साथ हवी आहे.

आज रोजी सरकार नुसते सल्ले देत आहे मुख्यमंत्री डॉक्टरांची भूमिका पार पाडत आहेत गरम पाणी प्या, वाफ घ्या, मास्क वापरा पण त्यांच्या पोटा-पाण्याचे विषय बाजूला ठेवून नुसते सल्ले.

काहीजण आमदार विनोदी (हसून घालवतात) भूमिका पार पाडत आहेत तर काहीजण गुंडाची (आडवे बोलतात).

एकच आमदार सामन्य जनतेसाठी देवदूता सारखा उभा राहिला आहे ज्यांची जगभरात चर्चा सुरु आहे. आपल्याला त्यांचे नाव सांगायची गरज नाही.

आज पारनेर तालुक्यात जगभरातून मदतीचा ओघ चालू आहे. व जगभरात कौतुक होत आहे. आप आपल्या तालुक्याच्या मंत्री महोदयांनी नुसते सल्ले न देता लक्ष घालावे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यात राजकारणाचा प्रश्नच येत नाही. आत्ता लोकांचा जीव वाचणे याला प्राधान्य दिले पाहिजे.

नुसते सल्ले देणारे नकोत तर समाजासोबत उभे राहून त्यांची सेवा करणाऱ्या नेत्यांची व लोकांची गरज आहे.

त्यामुळे राज्य सरकार असो वा केंद्र सरकार फक्त सल्ले नकोत साथ द्या. मदतीचा हात द्या!!
जेव्हा साथ देईल संपूर्ण भारत तेव्हा पुन्हा आनंदी होईल भारत.

सतीश (भाऊ) साबळे,
अध्यक्ष : महाराष्ट्र सोशल मिडीया

संपर्क : 9527817676, 7071973737
ऑफिस : 02112-295619

संबधित बातम्या