महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

आधुनिक सावित्रिंची आधुनिक वटपौर्णिमा; वटपौर्णिमेदिवशी सरडेवाडी महिला व ग्रामस्थांनी केली वटवृक्ष लागवड

आधुनिक सावित्रिंची आधुनिक वटपौर्णिमा; वटपौर्णिमेदिवशी सरडेवाडी महिला व ग्रामस्थांनी केली वटवृक्ष लागवड
June 26, 2021 08:49 AM ago Indapur, Maharashtra, India

सरडेवाडी : सरडेवाडीत १०० वटवृक्ष लागवड करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. सरपंच सिताराम जानकर व ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला ग्रामसंघाच्या महिला सदस्यांनी वटवृक्षलागवडीकरिता पुढाकार घेतला. ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ.सोनाली जानकर, सचिव सौ.नकुसा जमदाडे, कोषाध्यक्षा सारिका सरडे व महिला सदस्य उपस्थित होते. तसेच सरपंच सिताराम जानकर, उपसरपंच हनुमंत जमदाडे, सदस्य सतीश चित्राव, रविंद्र सरडे, गोकूळ कोकरे, प्रियंका शिद, सुप्रिया कोळेकर, वैशाली कोळेकर, वैशाली शिद, गयाबाई तोबरे, अलका कडाळे ग्रामसेविका स्वाती चव्हाण उपस्थित होते.

यावेळी बोलताना सरपंच सिताराम जानकर म्हणाले की, सरडेवाडी गाव राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे गाव आहे, टोलनाका असल्याने गावात होणारे प्रदूषण टाळण्यासाठी चोवीस तास ऑक्सिजन देणार्‍या वटवृक्ष लागवडीची मोहिम आम्ही आज हाती घेतली आहे, जेणेकरून मुबलक प्रमाणात ऑक्सिजन निर्माण होऊन पर्यावरणाचा समतोल साधला जाईल. तसेच रोपे उपलब्ध करुन देणार्‍या श्रमदान ग्रुपचेही आम्ही आभारी आहोत. आभार अतुल ढावरे यांनी मानले.

संबधित बातम्या