महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

गोठ्याला भीषण आग कडबा,काड तटपत्री व शेतकाम अवजारे जळून खाक

शेतकरी प्रकाश सखाराम दुबुकवाड यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ
गोठ्याला भीषण आग कडबा,काड तटपत्री व शेतकाम अवजारे  जळून खाक
March 30, 2021 08:49 PM ago Nanded, Maharashtra, India

वसीम शहापुरकर

देगलूर: देगलूर (जि. नांदेड) तालुक्यातील शहापूर येथील इंदीरा नगर परिसरात प्रकाश सखाराम दुबुकवाड यांच्या घराजवळील गोठ्यात लागलेल्या आगीत कडबा ,काही सोया धान्य व काड व असा काही शेतकरी संसार उपयोगी वस्तू ऐवज जळून खाक झाले त्यात सुदैवाने जीवितहानी टळली असुन एका शेतमजुरांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.

सविस्तर वृत्तांत असा की, प्रकाश सखाराम दुबुकवाड येथील शेतमजुर (वय41) वर्ष यांच्या गोठ्यात रात्री 2 ते 3 च्या दरम्यान अचानक आग लागली असुन टिनरेल गोटा असल्याने त्वरीत टिन दाराना पेठ घेतलें गोट्तील सर्व काही जाळून खाक झाले व आजुबाजुच्या लोकांनी आग विझविण्या साठी खुप प्रयत्न केले. पण तो पर्यंत गोठा जळून खाक झाले होते. घटनेची माहिती मिळताच देगलूर च्या अग्नी शमनदल तहसील कार्यालयाकडून प्रत्यक्ष येवून घडलेल्या घटनेचा पंचनामा केला आहे.

सद्याला दुबुकवाड कुटुंबावर मोठे संकट आले असून शासन व लोक प्रतिनिधींकडून काही तरी त्वरीत आर्थिक मदत मिळावे अशी अपेक्षा प्रकाश सखाराम दुबुकवाड यांची आहे. तर शासनाने या कुटुंबाला आर्थिक मदत व त्वरित शासनाकडून काही तरी मदत देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबधित बातम्या