महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

इंदापूर तालूक्यात रेमेडीसीवर औषधाचा प्रचंड तुटवडा.. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे रेमेडीसीवर औषध उपलब्ध करून देण्यात अपयशी - भाजप तालुकाध्यक्ष ॲड.जामदार यांचा आरोप

इंदापूर तालूक्यात रेमेडीसीवर औषधाचा प्रचंड तुटवडा.. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे रेमेडीसीवर औषध उपलब्ध करून देण्यात अपयशी       - भाजप तालुकाध्यक्ष ॲड.जामदार यांचा आरोप
April 11, 2021 11:11 AM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : प्रतिनिधी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या रेमीडीसीवर औषधाचा इंदापूर तालुक्यात सध्या तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.रुग्ण संख्या वाढत आहे. औषधाअभावी कोरोना रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. इतर तालुक्यांमध्ये हे औषध उपलब्ध होत आहे.मात्र इंदापूर तालुक्यात उपलब्ध होत नाही. अशा काळात इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्यमंत्री दत्तात्रय भरणेे हे रेमीडीसीवर औषध उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहेत,असा गंंभीर आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांनी केला आहे.

रेमीडीसीवर औषधाअभावी कोरोना रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे,अशी भितीही ॲड.जामदार यांनी व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.तसेच मृत्युची संख्याही वाढत आहे. कोरोना रुग्णांवर रेमीडीसीवर हे औषध प्रभावी आहे.ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची सुविधा पुरेशा प्रमाणात सहज उपलब्ध करुन दिल्यास रुग्ण लवकर बरा होतो. मात्र तालुक्यात वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या नियोजनात राज्यमंत्री अपयशी ठरले आहेत, असा आरोप जामदार यांनी केला.

भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे रुग्णांच्या नातेवाईकांचा फोन आल्यास उपचारासाठी बेड मिळवून देणे, रेमीडेसिवीरचे औषध मिळवून देण्यासाठी तत्पर असतात.रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सहकार्य करीत आहेत.तर दुसऱ्या बाजूला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, रेमीडेसिवीर औषधांचा साठा करून ठेवणेची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी असणाऱ्या राज्यमंत्र्यांची असताना त्यांच्याकडे असलेल्या नियोजनाच्या अभावामुळे कोरोना रुग्ण वाईट परिस्थितीतून जात आहेत.राज्यमंत्र्यांनी तालुक्यात रेमडेसिवीर औषधांचा साठा हा पुरेशा प्रमाणावरती उपलब्ध करून द्यावा,असे आवाहनही ॲड.जामदार यांनी केले आहे.

संबधित बातम्या