महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

वंचित बहुजन आघाडीने जपली सामाजिक बांधिलकी

वंचित बहुजन आघाडी चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा.राहुल चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त टेंभुर्णी येथे वृक्षारोपण
वंचित बहुजन आघाडीने  जपली सामाजिक बांधिलकी
June 14, 2021 09:43 PM ago Solapur, Maharashtra, India

टेंभुर्णी : वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष मा. राहुल चव्हाण सर यांच्या वाढदिवसानिम्मित वंचित बहुजन आघाडी माढा विभाग तसेच टेंभुर्णी शहर यांच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारे पिंपळ, वड, असे अनेक झाडे विविध मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.

सध्या कोविड काळात सगळीकडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे, त्या पार्श्वभूमीवर नैसर्गिकरित्या ऑक्सिजन सर्वांना मिळाला पाहिजे,या सामाजिक भावनेतून आज सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.राहुल चव्हाण सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी माढा विभाग व टेंभुर्णी शहर विभाग यांच्या वतीने टेंभुर्णी परिसरात मुख्य मोक्याच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष मा. राहुल चव्हाण, महासचिव मा. विशाल नवगिरे, जिल्हा उपाध्यक्ष मा. सत्यवान हांडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मा. औदूंबर लेंगरे, मा. ता. उपाध्यक्ष आण्णासाहेब वाघमारे, स्वाभिमानी युवा मंचाचे प्रदेशाध्यक्ष शुभमजी तोडकर, प्रा. युवराज वजाळे, गणेश खरात, तात्या सरवदे, भारत जगताप, विशाल मिसाळ, रंजित गायकवाड, जुगल खरात, राजु वाघमारे, सुमित खरात, निखिल खरात, समा लांडगे, किरण कांबळे, नितिन कांबळे, शुभम सिरसट, अमर गायकवाड, संकेत शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना चव्हाण सर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सर्व कार्यकर्त्यांनी मिळून राबवलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम स्तुत्य आहे, पुढील भविष्यकाळात टेंभुर्णी शहर ऑक्सिजन हब म्हणून उदयाला यावे, यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षलागवड मोहिम हाती घेणार आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःच्या तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या वाढदिवशी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. आभार विशाल नवगिरे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल मिसाळ, जुगल खरात, गणेश खरात, श्रींमत सरवदे, भारत जगताप, राजु वाघमारे यांनी प्रयत्न केले.

संबधित बातम्या