महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या पुढाकाराने काटी- वडापुरी जिल्हा परिषद मतदारसंघांत अठरा वर्षापुढील युवकांना कोवीशिल्ड लस देण्यास सुरुवात.

850 कोविशिल्ड लस उपलब्ध; तरुणांनी लसीकरणात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा- दत्ता मामा भरणे.
राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या पुढाकाराने काटी- वडापुरी जिल्हा परिषद मतदारसंघांत अठरा वर्षापुढील युवकांना कोवीशिल्ड लस देण्यास सुरुवात.
June 26, 2021 11:15 AM ago Indapur, Maharashtra, India

इंदापुर : राज्याचे राज्यमंत्री मा. श्री. ना. दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करीत काटी- वडापुरी जिल्हा परिषद मतदारसंघांमधील वडापुरी येथून अठरा वर्षांपुढीलल युवकांना कोवीशिल्ड लस देण्यास सुरुवात झाली.

यावेळी वडापुरी गावचे शिवाजी तरंगे गणेश चंदनशिवे, दादासाहेब जगताप दयानंद दादा, चंदनशिवे ऋषिकेश, चंदनशिवे उपस्थित होते. यावेळी मामांनी नवीन तरुण व ज्यांचा राहिलेला दुसरा लसीचा डोस घेण्याचे आव्हान केल्याने आज लस घेण्यास तरुणांचा सुध्दा चांगला प्रतिसाद दिसत होता.

यावेळी जिल्हा परिषद मतदारसंघांमधील हिंगणगाव, काटी, रेडणी गावातील उपकेंद्रांना भेट देऊन लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.काटी- वडापुरी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये ८५० कोविशिल्ड लस उपलब्ध करण्यात आली आहे.

या निमित्ताने उपकेंद्र अंतर्गत गावे असणाऱ्या गावांमधील त्या-त्या गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तेथील विविध पदाधिकारी, डॉक्टर, नर्स, आशा सेविका तसेच इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री.विजयकुमार परीट, इंदापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्री.सुनील गावडे, बिजवडी प्राथमीक आरोग्य केंद्राचे वैद्यकीस अधिकारी डाॅ.माधुरी चंदनशिवे उपस्थित होते.

संबधित बातम्या