मळद, बारामती ग्रामस्थांच्या वतीने श्री रामचंद्र नाना मदने यांचा जाहीर सत्कार संपन्न
बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मळद गावचे कार्यकर्ते श्री रामचंद्र नाना मदने यांचा जाहीर सत्कार आज रोजी ग्रामपंचायत कार्यालय मळद येथे संपन्न झाला.
गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री बबन दादा गावडे, श्री संजय तात्या गावडे पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक सागर भोंगळे, माजी सरपंच धनंजय भाऊ गवारे, श्री लालासाहेब तात्या गावडे यांच्या शुभहस्ते हा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गावचे सरपंच श्री योगेश बनसोडे, विकास भोसले, बजरंग पवार, पोलीस पाटील अविनाश गावडे पाटील, एकता शेतकरी गटाचे अध्यक्ष श्री प्रशांत तात्या शेंडे, कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पडळकर, श्री अमोल पवार, श्री नाना जाधव, श्री मुकुटराव गावडे पाटील, श्री नाना गावडे पाटील, श्रीराम परकाळे, श्री शशिकांत होले, पवार साहेब, सागर होले, शहाजी मदने, गणेश मदने, श्री दिलीप काका सुभेदार, ग्रामसेवक सुनिल पवार आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.