महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त इंदापुर पंचायत समिती येथे कृषी दिन साजरा.

कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त इंदापुर पंचायत समिती येथे कृषी दिन साजरा.
July 02, 2021 11:06 AM ago Indapur, Maharashtra, India

इंदापुर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग पुणे जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलास वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1जुलै रोजी पंचायत समिती इंदापूर येथे कृषी दिन साजरा करण्यात आला.

यावेळेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या हस्ते प्रतिमा व दीपपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी केलेल्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी चा आढावा घेण्यात आला व नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीसाठी चा संकल्प केला.

यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मा. श्री. विजयकुमार परीट, तालुका कृषी अधिकारी मा. श्री. किरण रूपनवर साहेब, कृषी अधिकारी मा. श्री सतीश महानवर, कृषी मंडळ अधिकारी मा. श्री. ए.यु रुपनवर, कृषी विस्तार अधिकारी मा. श्री. कबीर कदम विस्तार अधिकारी मा.श्री युनूस शेख, महाराष्ट्र सोशल मिडीयाचे अध्यक्ष सतीश भाऊ साबळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक मा.श्री युनूस शेख यांनी केले तर आभार मा. श्री. कबीर कदम यांनी मानले.

संबधित बातम्या