महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

शिवद्रोही गिरीश कुबेर याच्या पुस्तकावर 'बंदी' घालून राष्ट्रपुरुषाच्या बदनामीप्रकरणी गुन्हा दाखल करा - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड

पत्रकार गिरीश कुबेर यांच्या कडून छत्रपती संभाजी महाराज व मातोश्री सोयराबाई राणी माँसाहेब यांची पुस्तकातून बदनामी...
 शिवद्रोही गिरीश कुबेर याच्या पुस्तकावर 'बंदी' घालून राष्ट्रपुरुषाच्या बदनामीप्रकरणी गुन्हा दाखल करा - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड
May 23, 2021 08:59 AM ago Indapur, Maharashtra, India

पुणे- विशेष प्रतिनिधी अहमद शेख गिरीश कुबेर यांच्या Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra या पुस्तकामधील छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयरबाई राणीसाहेब यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह लिखाणाबाबत बंदीच घातली पाहिजे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज साहित्य होते. संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. चारित्र्यसंपन्न व स्वराज्य निष्ठीत असणाऱ्या राजावर रयतेचा सुद्धा प्रचंड प्रेम होतं. अशा छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणं हा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. संभाजीराजांच्या विरोधात अनाजीपंत यांनी ज्या पद्धतीने षडयंत्र करून छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने संभाजी राजांचा चारित्र्यहनन करण्याचं काम आजही कथा, कादंबर्‍या, मालिका व पुस्तकातून वेळोवेळी होत आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या विचारांचे मावळे म्हणून आम्ही छत्रपतींची बदनामी सहन करणार नाही. तथाकथित पत्रकार गिरिश कुबेर नामक लेखकाने छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. या पुस्तकामुळे आगामी काळात महाराष्ट्राला अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो. कुबेर यांचे लेखन समस्त महाराष्ट्र वासियांची मान शरमेने खाली जाईल असेच आहे. आम्हा सगळ्या इतिहास संशोधक - अभ्यासकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझी आपल्याला विनंती राहील की "रीनैसंस द स्टेट" या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी तसेच बाजारत विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शसनाच्या ताब्यात घ्यावीत. जो पर्यंत लेखक गिरिश कुबेर आणि प्रकाशक हार्पर कॉलिंस हा वादग्रस्त मजकूर पुस्तकातून काढून टाकत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने सर्व वितरकांना हे पुस्तक शासन दरबारी जमा करण्याचे आदेश द्यावेत. कुबेर हे एका दैनिकाचे संपादक म्हणून ओळखले जातात. ते अभ्यासून प्रकटतात असेही बोलले जाते. ते संभाजी महाराजांविषयी आज्ञानातून लेखन करतील असे वाटत नाही. त्यामुळे कुबेर हे या त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी विषयी असे बिनबुडाचे लिखाण करतात या मागे त्यांचा हेतू काय आहे याचीही चौकशी झाली पाहीजे. आपण या संवेदनशील विषयामधे लवकरात लवकर लक्ष घालवे व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा लेखक कुबेर आणि प्रकाशक हार्पर कोलिन्स यांच्या विरोधात आम्ही फिर्याद दाखल करु व संपूर्ण राज्याव्यापी आंदोलन करु याची आपण नोंद घ्यावी. महाराष्ट्रात गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेड गुन्हे दाखल करणार आहे. परंतु सरकारने सदर पुस्तकावर तात्काळ 'बंदी' घालावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. -

संबधित बातम्या