महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

बावडा येथील कोरोना सेंटरच्या रुग्णांना राजवर्धन दादा युवामंचा कडून अल्पोपहार आणि मास्क,सेनिटायझरचे वाटप

बावडा येथील कोरोना सेंटरच्या रुग्णांना राजवर्धन दादा युवामंचा कडून अल्पोपहार आणि मास्क,सेनिटायझरचे वाटप
June 13, 2021 08:44 AM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर प्रतिनिधी-अहमद शेख। राजवर्धन दादा युवामंच शाखेचे सदस्य अब्दुल भाई शेख यांच्या वाढदिवसा निमित्त बावडा येथील कोरोना सेंटरच्या रुग्णांना अल्पोपहार आणि मास्क,सेनिटायझरचे वाटप करण्यात आले. राजवर्धन दादा युवामंच कडून विधायक कार्य म्हणून कोरोना पार्श्वभूमीवर बावडा येथील कोरोना सेंटरच्या रुग्णांना केळि,चिप्स,मास्क,सेनिटायझर,पाणी बाँटल वाटप करण्यात आले. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते नुकतेच बावडा येथील शाखेचे उद्घाटन करण्यात आले आज या युवामंचाने वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून कोरोना पार्श्वभूमीवर रुग्णांना आवश्यक अशा वस्तूचे वाटप करून समाजापुढे चांगला आदर्श निर्माण केला आहे.

संबधित बातम्या